आपला जिल्हा

गोमातेच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; कापसे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम-आ आशुतोष काळें

गोमातेच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; कापसे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम-आ आशुतोष काळें

गोमातेच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; कापसे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम-आ आशुतोष काळें

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि. १४ सप्टेंबर २०२६ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कापसे फाउंडेशन व अहिल्या गोशाळेच्या वतीने गोमातेच्या शेणापासून तयार करण्यात आलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे हा कापसे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ आशुतोष काळें यांनी कापसे पैठणीच्या संचालिका  नुपूर कापसे यांनी त्यांची कोपरगाव येथे सदिच्छा भेट घेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आ. आशुतोष काळे यांना भेट दिली या प्रसंगी त्यांनी व्यक्त केल्या.

जाहिरात

येवला येथील नामांकित कापसे फाउंडेशन व अहिल्या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार करण्याचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. पारंपरिक श्रद्धा व संस्कृती जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी समाजाला प्रेरणा देणारा ठरत आहे.

जाहिरात

सध्या पर्यावरणाचा वाढता ऱ्हास लक्षात घेता गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर कापसे फाउंडेशन व अहिल्या गोशाळेने सुरू केलेला हा उपक्रम समाजासाठी आदर्शवत आहे. गोमातेच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार करून पर्यावरण संवर्धनाबरोबरच गोशाळेच्या माध्यमातून गोसंवर्धनालाही हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे.

आ. आशुतोष काळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून कापसे फाउंडेशन, अहिल्या गोशाळा तसेच नुपूर कापसे यांचे अभिनंदन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.या प्रसंगी त्यांच्या समवेत डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ कुणाल घायतडकर हे होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे