आपला जिल्हा

मातीच्या गणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

मातीच्या गणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

मातीच्या गणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

Kopargaon vijay kapse दि १२ सप्टेंबर २०२६ : कोपरगाव तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

जाहिरात

अवधूत चिंतनचे देवस्थान तळेगाव मळेचे सर्वेसर्वा श्री. महेंद्र दादा महाराज यांच्या प्रेरणेतून शाळेतील विद्यार्थ्यांना मातीपासून तयार केलेल्या गणपतीच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी गणपती रंगविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन केले.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकासाठी ७०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३०० रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती.

जाहिरात

यावेळी श्री. नितीन वाघ सर यांनी श्री. महेंद्र दादा महाराज यांचे स्वागत करून उपक्रमाची माहिती दिली. मुख्याध्यापक श्री. सुनील ढेपले यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. श्री. बापू हजारे सर यांनीही उपक्रमाचे स्वागत करून कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अशोक राहणे व श्री. अविनाश भिंगारदिवे सर यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जाहिरात

मातीच्या गणपतीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विचार, सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम साधण्यात आला. मातीच्या मूर्ती विसर्जनानंतर नैसर्गिकरीत्या मातीत मिसळत असल्याने जलप्रदूषण कमी करण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

यावेळी  शिवनाथ टूपके, वैभव साळुंके यांच्यासह ग्रामस्थ आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे