देवकौठेत अमृतवाहिनी बँकेची शाखा कार्यान्वित; अमृतवाहिनी बँकेतून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार – सुधाकर जोशी
पोल्ट्री व्यवसायासाठी कॅश क्रेडिट योजना लागू करणार

तळेगाव दिघे विजय कापसे दि १३ ऑगस्ट २०२५– लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कमी लोकसंख्या असली तरी पोल्ट्री आणि दूध व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या संपन्न ठरलेले देवकौठे गाव हे इतर गावांसाठी आदर्शवत असून पोल्ट्री व्यवसाय करता कॅश क्रेडिट योजना लागू करणार असून अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून या गावातील नागरिकांना चांगली सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले आहे.

देवकौठे येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचा नवीन शाखेचे कार्यारंभ झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे हे होते तर व्यासपीठावर संचालक अविनाश सोनवणे, ॲड.लक्ष्मण धुळगंड, अण्णासाहेब शिंदे, कचरू फड, किसनराव वाळके, शिवाजी जगताप, राजू गुंजाळ, दूध संघाचे संचालक भारत शेठ मुंगसे, भागवतराव आरोटे,जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, चेअरमन तुकाराम कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, नामदेव कहांडळ, शांताराम आरोटे, शाखाधिकारी अरुण गुंजाळ, बाजीराव सातपुते आधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुधाकर जोशी म्हणाले की, देवकौठे गाव हे जिल्ह्याच्या सरहदीवर आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या गावात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या असून या गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. विकास कामातून हे गाव आदर्श ठरले आहे. मात्र मोठ्या कष्टातून या गावाने पोल्ट्री व्यवसायातून समृद्धी निर्माण केली आहे. दूध आणि पोल्ट्री व्यवसाय यातून मोठी क्रांती करत आर्थिक समृद्धता निर्माण झाली आहे. अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून रिझर्व बॅंकेच्या परवानगीने येथे शाखा सुरू होत असून नागरिकांना अत्यंत आधुनिक सुविधा मिळणार आहे. फोन पे, एटीएम, आरटीजीएस, क्यू आर कोड, अशा सर्व सुविधा उपलब्ध असून नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले.
तर सुभाष सांगळे म्हणाले की, पोल्ट्री व्यवसायातून गावांमध्ये समृद्धी निर्माण झाली असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी देऊन विविध विकासाच्या योजना राबवल्या आहेत. गावची आर्थिक उलाढाल सुमारे दीडशे कोटींची असून कष्टातून उभे झालेल्या या गावाच्या कामाला बँकेच्या माध्यमातून अधिक बळकटी मिळणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी भारत शेठ मुंगसे भागवतराव आरोटे नानासाहेब शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी साहेबराव कहांडळ, राजाराम मुंगसे, प्रकाश मुंगसे, शत्रुघ्न मुंगसे, संपत आरोटे, नंदू मोकळ, अमोल कहांडळ, रामाजी शेवकर, सोपान मुंगसे, श्रीराम मुंगसे, अण्णासाहेब मुंगसे, बाबासाहेब मुंगसे, खंडू कहांडळ,काशिनाथ कहांडळ,तुकाराम भाऊसाहेब कहांडळ, उत्तम रतन मुंगसे आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कहांडळ यांनी केले. तर अरुण गुंजाळ व नामदेव कहांडळ यांनी आभार मानले.यानंतर शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.




