नितीनराव औताडे
पोहेगांव येथे रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी


कोपरगाव विजय कापसे दि १४ फेब्रुवारी २०२५– कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे राष्ट्रसंत रविदास जी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या हस्ते रविदासजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रविदास जी महाराज यांना अभिवादन करून नितीनराव औताडे यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
