चोख व्यवहारामुळे गोदावरी खोरे केन व गौतम केनला ऊस तोडणी कामगारांची प्रथम पसंती – आ. आशुतोष काळे
चोख व्यवहारामुळे गोदावरी खोरे केन व गौतम केनला ऊस तोडणी कामगारांची प्रथम पसंती – आ. आशुतोष काळे
गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीची वार्षिक सभा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २२ सप्टेंबर २०२४– ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या कमी असून त्यासाठी ट्रक्स धारकांनी स्वत:च्या ऊस तोडणी कामगार टोळ्या तयार करणे काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील ट्रक धारक, ट्रॅक्टर धारक स्थानिक ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या तयार करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात. त्याच धर्तीवर ट्रक धारकांनी ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या तयार करून जास्तीत व्यवसाय करावा. त्याकामी गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही देवून आपले सगळे व्यवहार चोख असल्यामुळे गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीला ऊस तोडणी कामगारांची प्रथम पसंती असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.
गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगरची ५३ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे मार्गदर्शक व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर शंकररावजी काळे व सौ. सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ झाला. अध्यक्ष पदाची सूचना रविंद्र आहेर यांनी मांडली. सदर सूचनेस अभिषेक गायकवाड यांनी अनुमोदन दिले. संचालक विक्रम मांढरे यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, गळीत हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी ऊस तोडणी कामगारांना अॅडव्हान्स देण्याची शिस्त लावली आहे. तीच परंपरा मा.आ.अशोकराव काळे यांनी सुरु ठेवली ती परंपरा आजतागायत सुरु असून ऊस तोडणी कामगारांना अॅडव्हान्स वाटप सुरु करण्यात आले आहे. आपले सर्व व्यवहार चोख असल्यामुळे सातत्याने ऊस तोडणी कामगार आपल्या कंपनी समवेत काम करण्यासाठी इच्छुक आहेत.मागील वर्षी गाळप हंगामात आलेल्या अडचणी दूर करण्यात आल्या असून यावर्षी गळीत हंगाम नियमितपणे सहा हजार टन ऊस गाळप करणार आहे. त्यामुळे ट्रक्सधारकांनी वेळेत ऊस पुरवठा कसा होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून एकत्रिपणे केन हार्वेस्टर घेवून जास्तीत जास्त व्यवसाय करावा असे आवाहन केले.
सभेचे प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व अहवाल वाचन जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी केले तर आभार संचालक विजयराव जाधव यांनी मानले.यावेळी सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, संचालक डॉ. मच्छिन्द्र बर्डे, सुधाकर रोहोम, वसंतराव आभाळे, सुनील मांजरे, श्रीराम राजेभोसले, मनोज जगझाप, अशोक मवाळ, अॅड. विद्यासागर शिंदे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केन ट्रान्सपोर्टचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष गवळी, गोदावरी खोरे संचालक दिलीपराव शिंदे, विजयराव जाधव, विक्रम मांढरे, प्रदीप कुऱ्हाडे, कैलास आहेर, अशोक निळकंठ, रमेश कोळपे, विजय थोरात, विक्रम सिनगर, गौतम केनचे संचालक भिकाजी सोनवणे, अरुण घुमरे, बबनराव भारसाकळ, रामदास कोळपे, भाऊसाहेब जोरे, माणिकराव चंद्रे, गणेश आहेर, आप्पासाहेब निकम कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक गावातून मताधिक्य वाढवा—
राजकारणात आरोप प्रत्यारोप चालूच असतात तो राजकारणाचा एक भाग आहे. एका महिन्यात आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. मतदार संघातील प्रत्येक गावाला भरघोस निधी दिला आहे आणि विकासकामे देखील पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.त्यामुळे प्रत्येक गावातून जास्तीत जास्त मताधिक्य वाढविण्यासाठी कामाला लागा, गाफील राहू नका.-आ.आशुतोष काळे.
आ.आशुतोष काळे यांचा विजय निश्चित—
या पाच वर्षात झालेला विकास आजपर्यंत कधीही झालेला नाही. मतदार संघाच्या विकासाचा दृष्टीकोन ठेवून अनेक दशकापासूनचे कित्येक प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी मार्गी लावले आहे. यामध्ये कोपरगाव शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, मंजूर बंधारा दुरुस्तीचा प्रश्न, वारी येथील गोदावरी नदीवरील पूल व मतदार संघातील कोट्यावधी निधीतून केलेले रस्ते असे एक ना अनेक प्रश्न या पाच वर्षात सुटले असून सत्ताधारी पक्षाचा आमदार कसा विकास करू शकतो याचे उत्तम उदाहरण आ.आशुतोष काळे यांनी दाखवून दिले आहे. सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडी अडचणी सोडवून दिवसाचे बारा-पंधरा तास मतदार संघासाठी आ. आशुतोष काळे यांनी दिल्यामुळे मतदार संघातील विकासाचे प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे मतदार संघातील जनता मतदानाची वाट पाहत असून येणाऱ्या निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांचा विजय निश्चित आहे. – विजयराव जाधव (संचालक गोदावरी खोरे केन)