शिंगणापूरचे डॉ विजय काळे यांचे आईच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत रुग्ण तपासणी शिबिराचे सर्वत्र होत आहे कौतुक
शिंगणापूरचे डॉ विजय काळे यांचे आईच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत रुग्ण तपासणी शिबिराचे सर्वत्र होत आहे कौतुक
शिंगणापूरचे डॉ विजय काळे यांचे आईच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत रुग्ण तपासणी शिबिराचे सर्वत्र होत आहे कौतुक

कोपरगाव विजय कापसे दि २५ सप्टेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ. विजय दादाहारी काळे हे सर्व परिचित असून जवळ पासच्या ५ ते ७ गावाना ते आपली अविरतपणे वैद्यकीय सेवा देत असतात त्यांच्या आई श्रीमती छबूबाई दादाहरी काळे यांची आपला मुलगा डॉक्टर होऊन समाजातील गोरगरोब रुग्णाची सेवा करावी ही इच्छा होती तीच आईची इच्छा विजय काळे यांनी आपल्या अथक परिश्रम व हुशारीच्या जोरावर पूर्ण करत डॉक्टर होऊन शिंगणापूर येथे श्रद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रुग्ण सेवा करत आहे.

डॉ. विजय काळे हे १० वर्षाचे असताना त्यांचा वडिलांचे निधन झाल्यानंतर डॉ काळेच्या आईने काबाड कष्ट करत सर्व भावंडाना शिकवत स्वतःच्या पायावर उभे केले होते या कामी त्यांना डॉ काळे यांच्या आत्या कमल भास्कर कदम व मावशी शोभा सूर्यभान काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.

१९ वर्षांपूर्वी आईचे निधन झाल्यानंतर डॉ काळे यांचे सेवानिवृत्त मोठे बंधू बाळासाहेब काळे, बहीण शिक्षिका आकांक्षा वाघ तसेच शेतकरी बंधू संजय काळे या संपूर्ण काळे कुटूंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता या दुःखातून सावरत डॉ काळे यांनी आपण देखील समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आई च्या निधनानंतर तब्ब्ल १९ वर्षांपासून आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी आपल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये आईच्या पुण्यतिथी दिनी दिवसभर येणाऱ्या सर्व रुग्णाची मोफत तपासणी करत त्यांना आरोग्यविषयक योग्य ते मार्गदर्शन करत असतात.

त्याच अनुषंगाने डॉ विजय काळे यांनी मंगळवार दि २४ सप्टेंबर रोजी आपल्या आईच्या पुण्यतिथी दिनी साधारणपणे ६० पेक्षा अधिक रुग्णाची मोफत तपासणी करत आपल्या आई च्या आठवणीना उजाळा दिला आहे.डॉ विजय काळे हे शिंगणापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच असून त्यांना या उपक्रमास त्यांच्या पत्नी शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या राजश्री काळे यांचे देखील मोलाचे सहकार्य असते. डॉ काळे यांच्या गेल्या १९ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या आई च्या पुण्यतिथी दिनी मोफत रुग्ण तपासणी या स्तुत्य उपक्रमाचे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बीपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या सह समस्त शिंगणापूर मधील ग्रामस्थ आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आदिनी कौतुक केले आहे. आजच्या महागाई च्या दुनियेत डॉ काळे कडून वर्षातील एक दिवस तरी आजारपणात रुग्णांना सहकार्य लाभते ही कौतुकास्पद बाबच म्हणावी लागेल. तसेच आईच्या स्मृती प्रित्यर्थ नेहमीच दर मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांची मोफत रुग्ण तपासणी व उपचार करत असतात हे शिबीर यशस्वीतेसाठी वैरागिनाथ मेडिकलचे दत्तात्रय चव्हाण, तुषार साळवे व नवनाथ कुऱ्हे यांनी अथक परिश्रम घेतले.




