आपला जिल्हा
तिडके पाटील विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
तिडके पाटील विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
तिडके पाटील विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
कोपरगाव विजय कापसे दि २५ सप्टेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये थोर समाजसुधारक, शिक्षण प्रसारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ वा जयंती सोहळा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची पारंपारिक ढोल लेझीमच्या तालावर मिरवणूक काढत विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक जामदार व्ही. एन. भास्करराव चांदगुडे, सचिनभाऊ चांदगुडे, महेश गाडे, राहुल चांदगुडे, गणेश नागरे यांच्या हस्ते प्रतिमांचे व कर्मवीर रथाचे पूजन करण्यात आले.तर गावात ठिकठिकाणी प्रतिमेला पुष्पहार घालून औक्षण करून मिरवणुकीचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन डाॅ. मच्छिंद्र बर्डे यांनी भूषविले होते. बहुजन व शेतकऱ्यांच्या गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका हा मंत्र विद्यार्थ्यांना देऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेने शहरी भागासारख्या शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होताना दिसून येतो. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कष्ट करावे असे प्रतिपादन कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी याप्रसंगी केले.
आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची असेल तर कर्मवीर अण्णांनी स्वावलंबी शिक्षणाचा मंत्र दिला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य करावे व आपल्या विद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी विद्यार्थी विवेकानंद जगदाळे ॲडव्होकेट जिल्हा न्यायालय नाशिक यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माजी प्राचार्य पोपटराव पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनातील विविध प्रसंगांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन जीवनात यश प्राप्त करून आपली परिस्थिती बदलावी असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.या कार्यक्रमाचे अहवाल वाचन व प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए.आर.यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय थोरात के.जी. मोमीन आय.ए.के. यांनी करून दिला. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील गावित एम.जे. यांना विद्यालयाचा आदर्श शिक्षक व तिडके प्रन्वी हिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. तुलसी तांगतोडे सिद्धी पगारे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीची सदस्य सचिन चांदगुडे, सिताराम गाडे, भास्करराव चांदगुडे, महेश गाडे, नानासाहेब बनसोडे, विकासराव चांदगुडे, अशोकराव माळी, प्रकाश शिंदे, पवनकुमार चांदगुडे, सिताराम चांदगुडे सर, कैलास माळी, देविदास कासोदे, तुकाराम गाडे, संतोष पह्रे, सचिन गाडे, संजय चव्हाणके, तलाठी दिपाली विधाते, हर्षद गाडे, रमेश गवळी , विधाते सर, कमलाकर चांदगुडे, पत्रकार भगीरथ गाडे, कैलास नवले, नरेंद्र आहेर, देविदास मोरे, सुनील जेजुरकर, सायली नेवासकर, पवार, पर्यवेक्षक ठुबे जे. एस. आदी मान्यवर, माजी विद्यार्थी, माता, पालक, पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे आर.के. व पारधे ए.एम.यांनी केले तर आभार घोलप पी.बी.यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घोलप पी.बी.गावित एम.जे. चंदने पी.आर. मोरे आर. के.आडेप पी.व्ही. सारबंदे एन.एच. शेख आर.एन. मोमीन आय.ए.के. पारधे ए.एम. खोंडे आर.सी. राऊत एस. एल. बागुल जी. एम. शिळकंदे व्ही.ए. गोडे एस.एम. माळी एस.एल. चौधरी एच.एस. कु. सोनवणे मॅडम, थोरात के.जी.पवार आर.बी. पेटारे ए.बी. काशिद एस.एस. सुपेकर जे.डी.डोखे एन.ए. गाडे ए. एम. कदम टी.ए. कांदळकर व्ही.ए. चांदगुडे टी.ए. बोरसे एन.डी. मोहन जाधव, मंडलिक एस.टी. पवार एस. एस. कापसे के.डी.यांनी परिश्रम घेतले.