भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये शद्विका अमोल चंदनशिवे हिचे यश
भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये शद्विका अमोल चंदनशिवे हिचे यश
भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये शद्विका अमोल चंदनशिवे हिचे यश
कोपरगाव विजय कापसे दि २५ सप्टेंबर २०२४— शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा, कोपरगावची विद्यार्थिनी व अहमदनगर जिल्हा पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयाचे जिल्हाप्रशिक्षक, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे यांची कन्या शद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिने उल्लेखनीय यश संपादन केले.
एज्युकेट अकॅडमी, महाराष्ट्र या संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेकडे कल निर्माण व्हावा व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी म्हणून भारत टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करीत असते. सदर परीक्षेमध्ये शाद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिने कोपरगांव केंद्रातून इयत्ता १ लीच्या वर्गांत प्रथम क्रमांक व राज्य गुणवत्ता यादीत १९ वा क्रमांक प्राप्त करत नेत्रदीपक यश मिळवले आहे. या यशाबद्दल संस्थेने शाद्विका हिला स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
सदर परीक्षेमध्ये कोपरगाव तालुक्यातील पहिलीच्या वर्गामध्ये जवळपास ६० विद्यार्थी बसलेले होते. या परीक्षेसाठी वर्गशिक्षिका खरे मॅडम, मुख्याध्यापक गवळी सर, शेटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा,कोपरगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक गवळी सर, उपध्यापक शेटे सर, वर्गशिक्षिका खरे मॅडम यांनी अभिनंदन केले. स्कुल कमिटीचे अध्यक्ष हेमंत पटवर्धन व सचिव दिनेश दारुणकर सदस्या ज्योती कोऱ्हाळकर व दिपाली पटवर्धन,आबासाहेब पटवर्धन शिशु विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.सरिता कोऱ्हाळकर, नगर पालिका शिक्षण विभागाचे प्रशांत शिंदे सर, तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.