पंडित भारुड यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर
पंडित भारुड यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर

कोपरगाव विजय कापसे दि २६ सप्टेंबर २०२४: तालुक्यातील संवत्सर येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व पंडित जमनराव भारुड सर यांना कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्रोडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार २०२४ जाहीर झालेला आहे. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीदिनी नाशिक येथे प्रदान करण्यात येणार आहे.

भारुड यांनी कै. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित ४५ मिनिटांची डॉक्युमेंटरी फिल्म विजयी गाथा बनविली असून कोल्हे साहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र ,पोवाडे, गीते भारुड यांनी स्वतः लिहिलेले आहे . तसेच “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान “व्याख्यान सीडी त्याचप्रमाणे त्यांनी मराठी स्व. लिखित गीताचे रेकॉर्डिंग केलेले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार २०२४जाहीर झाल्याचे निवडीचे पत्र आयोजक स्वागताध्यक्ष सुनील मोंढे सर नाशिक यांनी त्यांना नुकतेच दिले आहे.

भारुड यांनी गंडेतोडे, लाव्हा ,क्रांतिसूर्या,पीसीबी,आदि प्रबोधनात्मक पुस्तकाचे लेखनही केलेले आहे. त्यांना सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता तसेच समाजभूषण असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा शंकरराव कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन नितीन दादा कोल्हे, पहिल्या महिला आमदार स्नेहलताताई बिपिन दादा कोल्हे, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी विश्वस्त अमितदादा कोल्हे तसेच कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेकभैया बिपिन दादा कोल्हे तसेच गायक सुधीर रूपवते यांनी भारुड यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.




