संगमनेर

कवी अनंत फंदी स्मृती करंडक आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे संगमनेर मध्ये आयोजन

कवी अनंत फंदी स्मृती करंडक आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे संगमनेर मध्ये आयोजन

कवी अनंत फंदी स्मृती करंडक आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे संगमनेर मध्ये आयोजन

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २६ सप्टेंबर २०२४सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय, भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री जुनियर कॉलेज व कवी अनंत फंदी प्रतिष्ठान संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कवी अनंत फंदी आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न होत आहे. कवी अनंत फंदी हे संगमनेरचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या वाद विवाद स्पर्धेचा या वर्षीचा विषय हा सध्याच्या वैज्ञानिक युगातील मानवासमोर उभा असलेल्या सगळ्यात मोठ्या आव्हानांचा म्हणजेच “कृत्रिम बुद्धिमत्ता समाजाला पूरक कि मारक” या विषयावर विचार मंथन होणार आहे. दरवर्षी या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून शंभरहून अधिक स्पर्धक महाराष्ट्रातल्या विविध महाविद्यालयातून सहभागी होतात. या स्पर्धेच्या निमित्ताने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये दर्जेदार वैचारिक मंथन होते.

जाहिरात

या स्पर्धेच्या आयोजनासाठी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेच्या नियोजन बैठकीत सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनानाथ पाटील, भाऊसाहेब गुंजाळ पाटील जुनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा.किसन खेमनर व कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र भंडारी यांनी स्पर्धा आयोजनाबाबद माहिती दिली. या स्पर्धेचे आयोजन सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयाच्या कै.के.बी.दादा देशमुख सभागृह या ठिकाणी दि २८ सप्टेंबर २०२४ होत आहे.

जाहिरात

सदर स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अनेक वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेपैकी एक महत्वाची स्पर्धा समजली जाते. तरी विविध महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक यांना आवाहन करण्यात येते की आपल्या महाविद्यालयातील जास्तीत विद्यार्थ्याना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन स्पर्धेच्या आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे

जाहिरात मुक्त

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे