आपला जिल्हा

आदिवासी महादेव कोळी समाजाचे कोपरगावात बेमुदत धरणे आंदोलन सुरू 

आदिवासी महादेव कोळी समाजाचे कोपरगावात बेमुदत धरणे आंदोलन सुरू
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आंदोलन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ ऑक्टोबर २०२४कोपरगाव येथे आदिवासी महादेव कोळी युवक संघ शाखेच्या वतीने विविध मागण्यासाठी मंगळवार दि २ऑक्टोबर २०२४ पासून कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारी  जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणपत दवंडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून संघटनेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळेस सुरेश कांगुणे, चंद्रकांत शेजुळ ,दत्तोबा वायखिंडे ,संजय वायखिंडे भगवान मेढे  संजय रविंद्र जाधव मधुकर लंगोटे साळुंखे भरत आगलावे अंबादास दरेकर आरपीआय तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष उत्तम पवार हंसराज लवांडे आदी समाज बांधव उपस्थित होते.

जाहिरात
या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांनी सांगितले की, शासनाला धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितल्यानुसार जात पडताळणी समित्या रद्द करण्यात याव्या, सुप्रीम कोटीतील माधुरी पाटील केस मधील आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाला ” कोळी “नोंदीवरून जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र विनाअट देण्यात यावेत, कुटुंबातील सवींना एकाच वेळेस जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावेत, अ. नगर जिल्ह्यासाठी मंजूर असलेली अनु. जमाती जात पडताळणी समिती शिर्डी येथे त्वरित सुरूकरण्यात यावी, त्याचप्रमाणे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूरचे उपकेंद्र शिडी येथे व्हावे, उच्चवर्णीय समाजाला (ब्राह्मण) आदिवासी समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र (कपल व्हॅलिडीटी) दिलेले आहे., त्या समितीवर व वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या दोघांवर कठोर कारवाई करण्यात यावी,

जाहिरात

किरण माळी, सह आयुक्त अनु. जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिति नाशिक यांचेवर लाच लुचपत विभागाने लाच घेतल्या प्रकरणी कार्यवाही केली होती त्यांना पदावरुन दूर करण्यात यावे. ही मागणी मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांनीच विधानसभेत केली होती. त्याची अमलबजावणी करावी. तसेच त्यांचे काळात दिलेल्या वैधता प्रमाणपत्र देताना मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली असल्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी आदि मागण्याचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहेत.

जाहिरात

जर  या मागण्यांची पूर्तता न झाल्यास जिल्ह्यातील सुमारे दीड लाख आदिवासी महादेव कोळी समाज या आंदोलनात टप्प्याटप्प्याने सहभागी होणार असल्याची माहिती अमित आगलावे जिल्हाध्यक्ष यांनी दिली.तरी शासनाने लवकर आमच्या मागण्याची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे