के जे सोमय्या कॉलेज

सोमैया महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मनःशांती कार्यशाळा

सोमैया महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मनःशांती कार्यशाळा

सोमैया महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मनःशांती कार्यशाळा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ ऑक्टोबर २०२४प्रौढ आणि वृद्धांबरोबरच विद्यार्थी जीवनात देखील ध्यानाचे निर्विवाद महत्त्व असून तणाव मुक्तीसाठी मनशांती अत्यंत महत्त्वाची आहे. मनशांतीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या नियमित कामांचे नियोजन करून ध्यानधारणा केल्यास ते आपल्या आयुष्यात शारीरिक व मानसिक आरोग्य नक्कीच जोपासू शकतील” असे प्रतिपादन डॉ. सुभाष पाटणकर यांनी कोपरगाव येथील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि स्टुडंट्स मेंटॉरींग  प्रोग्रामच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘ध्यानाद्वारे तरुण मनाची जोपासना’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.

जाहिरात

अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या आधारस्तंभ शोभाताई रोहमारे होत्या. यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे  शर्मा आणि सौ. पाटणकर यांची उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरून बोलताना शोभाताई रोहमारे म्हणाल्या की “तणाव हा विद्यार्थ्यांच्या सुखी जीवनासाठी मारक असून मनःशांती व ध्यानधारणा हे पोषक तत्व आहेत. परिणामी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच ध्यानधारणा देखील केली पाहिजे, तरच आजचा विद्यार्थी हा तणावमुक्त होईल.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना युवा पिढीच्या जीवनात ध्यानधारणा व मनःशांती चे महत्व स्पष्ट केले. पाटणकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक देखील करून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्टुडंट्स मेंटोरिंग प्रोग्रामचे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी देखील स्टुडंट्स मेंटॉरिंग विभाग बांधील आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि अभ्यास हे तर उपक्रमांबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी देखील हा विभाग घेत असतो.” या कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृंद व बहुसंख्या विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वसुदेव साळुंके, प्रा. रावसाहेब गायकवाड, डॉ. नीता शिंदे, प्रा.वर्षा आहेत. प्रा. विजय सोमासे व प्रा.नुपूर औताडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे