आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी ८७ लाख ५० हजार रुपये मंजूर
आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी ८७ लाख ५० हजार रुपये मंजूर
संगमनेर विजय कापसे दि १५ ऑक्टोबर २०२४– राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठ्पुराव्यातून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राथमिक शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी ८७ लाख ५० हजार रूपये मंजुर झाले असल्याची माहिती डॉ.जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.जाहिरात
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यात १७१ गावे व २४८ वाड्या वस्ती आहेत. या सर्व गावांमध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. यात ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी म्हणून तालुक्यातील ७ गावांच्या शाळांच्या इमारत बांधकामासाठी ८७ लाख ५० हजार मोठा निधी मिळाला आहे.जाहिरात
ढोलेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १२ लाख ५० हजार, कुरण ऊर्दु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी ११ लाख ५० हजार, शिंदोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १२ लाख ५० हजार,सावरगावतळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १२ लाख ५० हजार, खळी (कांगणवाडी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १२ लाख ५० हजार, खळी (लबडे वस्ती) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १२ लाख ५० हजार, कौठे खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १२ लाख ५० हजार असा मोठा निधी मंजूर झाला आहे. ढोलेवाडी, कुरण, शिंदोडी, सावरगावतळ, खळी (कांगणवाडी),खळी (लबडे वस्ती, कौठे खुर्द आदी गावातील नागरिकांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या आभार व्यक्त केले आहे.