आपला जिल्हा

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २७२ मतदान केंद्र तर दोन लाख ८८ हजार ४११  मतदार

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २७२ मतदान केंद्र तर दोन लाख ८८ हजार ४११  मतदार

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २७२ मतदान केंद्र तर दोन लाख ८८ हजार ४११  मतदार

कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑक्टोबर २०२४अखेर महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक प्रक्रिया मंगळवार दि १५ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केली असून यात मंगळवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची आदिसूचना जारी होईल तर मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अखेरची मुदत असेल तसेच नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी होऊन सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख असेल तर बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया होऊन शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर  रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न होईल तरी या निवडणूक प्रक्रिया करीता मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

जाहिरात

या निवडणूक प्रक्रियेत संपूर्ण राज्यात बहुचर्चित असा सहकाराची  पंढरी म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील सहकारातील मातब्बर घराणे म्हणून संपूर्ण राज्यात एक वेगळीच ओळख असलेल्या २१९- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २७२ मतदान केंद्र असून यात १ लाख ४५ हजार ८३४ पुरुष मतदार तर १ लाख ४२ हजार ५७१ स्त्री  व तृतीयपंथीय ६ असे एकूण २ लाख ८८ हजार ४११ मतदारासून यात १८ ते १९ वयोगटातील ७ हजार ९६३ मतदार,  २० ते २९ वयोगटातील ६५ हजार ७७५ मतदार, ३० ते ३९ वयोगटातील ६० हजार ४६८ मतदार, ४० ते ४९ वयोगटातील ५८ हजार ७६७ मतदार, ५० ते ५९ वयोगटातील ४४ हजार ६०८ मतदार, ६० ते ६९ वयोगटातील  २८ हजार ७४८ मतदार, ७० ते ७९ वयोगटातील १४ हजार ८३० मतदार, ८० ते ८९ वयोगटातील  ५ हजार ९४१ मतदार, ९० ते ९९ वयोगटातील १ हजार १९२ मतदार, १०० ते १०९ वयोगटातील ११८  मतदार तर १२० पेक्षा अधिक वय असलेला १ मतदार  असे एकूण २ लाख ८८ हजार ४११ मतदार कोपरगाव विधानसभा मतदार संघात आहे.

जाहिरात

कोपरगाव २१९ विधानसभा मतदान केंद्रासाठी नामनिर्देशन पत्र कोपरगाव येथील तहसील कार्यालयातील सुनावणी कक्षात स्वीकारले जाणार आहे तर मतमोजणी शहरातील सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या तळमजल्यामध्ये होणार आहे तर या निवडणूक प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १० हजार रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ हजार रुपये इतकी अनामत रक्कम असणार आहे. तर उमेदवारांना निवडणुकीसाठी ४० लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने ठरवून दिली आहे.

जाहिरात

तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाकरिता अहिल्यानगर येथील भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप व कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संतोष राऊत हे असणार आहे. त्यासोबतच कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह सर्व विभाग मिळून तब्बल २ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रिया संपन्न करण्यासाठी कार्यरत असणार आहे.

निवडणूक

कोपरगाव विधानसभा मतदार संघात ३०७ सैनिकांचे मतदान

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे