आपला जिल्हा

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे- उपजिल्हाधिकारी सायली सोळंके 

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे- उपजिल्हाधिकारी सायली सोळंके 
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे- उपजिल्हाधिकारी सायली सोळंके 

कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑक्टोबर २०२४नुकतीच महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून मंगळवार दि १५ ऑक्टोबर पासून संबंध राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांनी केले आहे.

जाहिरात

कोपरगाव विधानसभा निवडणुकीसंदर्भात नुकतीच कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली या प्रसंगी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक. संतोष राऊत आदिसह कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका कार्यालय तसेच पोलीस विभागाचे वेगवेगळे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

या प्रसंगी कोपरगाव निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळुंके यांनी बोलताना सांगितले की, कोपरगाव विधानसभा २१९ मतदारसंघांसह संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे २० नोव्हेंबर रोजी मतदान होऊन २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे या प्रक्रियेकरीता मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसहिता लागू झाली असून या आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी करत कुठे आचारसंहितेचा भंग होत असेल तर कोपरगाव तहसील कार्यालयातील निवडणूक आचारसंहिता कक्ष किंवा निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री नंबर वर संपर्क साधत आपली तक्रार नोंदवावी.

उपजिल्हाधिकारी सोळंके व तहसीलदार सावंत
तर या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी बोलताना सांगितले की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये शासकीय, नियम शासकीय, खाजगी आस्थापना किंवा वैयक्तिक कुठेही पक्षाचा प्रचार, पक्षाचे बोधचिन्हे, पक्षाचे स्लोगन, पक्षाची जाहिरात, पक्षाच्या नेत्यांचे फोटो, राजकिय झेंडे किंवा इतर राजकिय फलक लावलेले असेल तर ते तात्काळ सर्वांनी काढून घ्यावे जर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ते लावलेले फलक जाहिरात फोटो कुठे आढळून आले तर त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील त्यामुळे सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे