आपला जिल्हा

लक्ष्मीबाई विद्यालयातील तोरकडची विभाग स्तरावरील मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड

लक्ष्मीबाई विद्यालयातील तोरकडची विभाग स्तरावरील मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड

लक्ष्मीबाई विद्यालयातील तोरकडची विभाग स्तरावरील मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे दि १७ ऑक्टोबर २०२४अहिल्यानगर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील कौस्तुभ तोरकड या विद्यार्थ्यांचा १०० मीटर व ३०० मीटर धावणे मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असून यातून त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने विद्यालयाच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहिरात

सदर निवडीबद्दल कौस्तुभ याचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य  दादाभाऊ कळमकर ,जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे ,अभिषेक कळमकर, अर्जुनराव पोकळे, शाळा समिती सदस्य अंबादास गरुडकर, सल्लागार समिती सदस्य माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव काळे, माजी प्राचार्य कैलासराव मोहिते, व्यवहारे साहेब, म्हस्के साहेब, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे,मार्गदर्शक शिक्षक प्रदीप पालवे तसेच लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शैक्षणिक संकुकातील सर्व सेवकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक करून विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा देतांना मुख्याध्यापिका

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे