आपला जिल्हा

रा.स्व.संघाचा कोपरगांव उपखंडाचा विजयादशमी उत्सव संपन्न

रा.स्व.संघाचा कोपरगांव उपखंडाचा विजयादशमी उत्सव संपन्न

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुल्या मैदानावर भर पावसात संघ स्वयंसेवक यांचे शिस्त आणि धैर्याने दर्शन.

कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑक्टोबर २०२४कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, समरसता, स्वबोध, नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीवर आधारित राष्ट्र सर्वार्थाने बलशाली करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सदभाव सहसंयोजक प्रमोद कुलकर्णी यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोपरगांव शहर उपखंडाच्या वतीने विजयादशमी उत्सव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सदभाव सहसंयोजक प्रमोद कुलकर्णी, तालुका संघचालक सुरेश विसपुते हे उपस्थित होते.

जाहिरात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो शाखांमधून कोट्यवधी स्वयंसेवक हे विविध राष्ट्रीय कार्यात समर्पित भावनेने दैनंदिन झोकून देत कार्यरत आहे. कोपरगांव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यपुर्व काळापासून परंपरा आहे. हा विचारांचा वारसा जोपासत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत आहे.या प्रसंगी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विश्वातील सर्वात मोठी संघटना असून या संघटनेचे उत्सव जवळून पहाण्याची पहाण्याची ईच्छा होती.आज ती पुर्ण झाली.असे सांगत डॉ. आव्हाड पुढे म्हणाले, भारतीय सण हे आयुर्वेदशास्राचे निगडित असून प्रत्येक सणाचे वेळी विशिष्ट परंपरा असल्याचे सांगितले.

जाहिरात

विजयादशमी उत्सव निमित्ताने शहरातील प्रमुख रस्त्यावरुन सवाद्य गणवेश परिधान केलेल्या स्वयंसेवक यांनी पथसंचलन काढण्यात आले. संचलन मार्गावर शहरातील महिलांनी रांगोळी साकारुन पुष्पवृष्टी केली.बसस्थानकाजवळील डॉ. केशव हेडगेवार चौक येथे येथे भगवा ध्वज उभारुन रांगोळी,फुलांची सजावट करण्यात आली होती.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव हेडगेवार, प. पू. गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेसह शस्रपुजन पुजन करण्यात आले.उत्सवाचा प्रारंभ पद्य, अमृत वचनाने झाला.सुरुवातीपासून वरुणराजाने हजेरी लावत उपस्थित वक्त्यांचे मनोगत सुरु असतांना रौद्र रुप धारण केले होते. सतत जोरदार पाऊस सुरु असतांनाही भर पावसात उपस्थित स्वयंसेवकांनी न डगमगता ठामपणे जागेवर बसून उत्सवात सहभाग घेतला.कार्यक्रमाचा समारोप प्रार्थनेने झाला. यावेळी परिसरातील अनेक नागरीक, महिला वर्ग मोठया प्रमाणावर उपस्थित होता.निवेदन कोपरगांव उपखंडाचे अवधुत गायकवाड यांनी सादर केले.

आजचा भरपावसात झालेला विजयादशमीचा उत्सव स्मरणीय आणि उर्जा देणारा ठरला असल्याची स्वयंसेवकांनी सांगितले तर संघ स्वयंसेवकाच्या शिस्त आणि निष्ठेचे यथार्थ दर्शन घडल्याची प्रतिक्रिया कोपरगांवकरात उमटली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे