गायत्री थोरातच्या रूपाने जवळके गावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
गायत्री थोरातच्या रूपाने जवळके गावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

कोपरगांव विजय कापसे दि १३ एप्रिल २०२५– कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील ज्येष्ठ नेते लक्ष्मण दादा थोरात यांची नात जवळके गावच्या शिरपेचात तुरा रोवलेल्या गायत्री रामभाऊ थोरात हिची जपान या विदेशी नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याबद्दल जवळके तसेच परिसराच्या वतीने कर्मवीर शंकराव काळे सहकारी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी व्यासपीठावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे संचालक राहुल रोहमारे,भारतीय जनता पार्टीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष कैलास राहाणे, माजी संचालक सुनिल शिंदे,मा.पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहाणे, के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक संदिप रोहमारे,माजी सरपंच बंडुभाऊ थोरात, शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष रावसाहेब थोरात, माजी सरपंच बाबुराव थोरात,सरपंच गोपीनाथ राहाणे,सरपंच विक्रम पाचोरे,उपसरपंच सुनिल थोरात ,माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, ह.भ.प भास्कर महाराज गव्हाणे, ह.भ.प साईराम महाराज राहाणे आदींसह परिसरातील शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विद्यार्थ्यांनी टीव्ही व मोबाईलच्या अति वापरापासून दूर राहून गरजे पुरताच मोबाईलचा वापर करत जास्तीत जास्त मैदानी खेळ तसेंचवअभ्यासासोबत अवांतर वाचनावर भर देत कठोर परिश्रम व प्रामाणिक पणा अंगाशी बाळगावा त्यातून यश हमखास मिळते.गायत्री थोरात







