कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी तुझे सर्वच हट्ट मी पूर्ण करीन, तुला कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही-अजितदादा पवार
कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी तुझे सर्वच हट्ट मी पूर्ण करीन, तुला कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही-अजितदादा पवार
आपला गडी एक नंबर, आशुतोषला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या; जास्त निधी पण देतो आणि मोठी जबाबदारी पण देतो -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
आ. आशुतोष काळेंना मंत्रीपद देण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे सुतोवाच
कोपरगाव विजय कापसे दि १५ नोव्हेंबर २०२४ :- आपण जे काही करतो ते या मायबाप जनतेसाठी करतो. त्यांच्यासाठी वेळ देणे आणि त्यांचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. मला नेहमीच अशी माणस आवडतात जे स्वत:साठी नाही समाजासाठी मागतात त्या कर्तबगार माणसाच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो आहे. तू देखील आजवर स्वत:साठी काही मागितले नाही जे काही मागतो ते या जनतेसाठी मागतो.त्यामुळे तुझ्या विकासाच्या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आणि कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी तुझे सर्वच हट्ट मी पूर्ण करीन, तुला कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही. आजवर तुझ्या पाठीशी होतो व यापुढेही तुझ्या पाठीशी राहील अशी ग्वाही कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब मैदानावर पार पडलेल्या जाहीर सभेत उपस्थित जनसागराच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी दिली. त्याचबरोबर उपस्थित जनसमुदायाला आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करून जास्त निधी पण देतो आणि मोठी जबाबदारी पण देतो असा शब्द देवून आ. आशुतोष काळे यांना मंत्रीपद देण्याबाबत अप्रत्यक्षपणे सुतोवाच केले.
कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब मैदानावर महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) अधिकृत उमेदवार आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची गुरुवार (दि.१४) रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. यावेळी व्यासपीठावर महानंदाचे माजी चेअरमन राजेश परजणे, अशोकराव रोहमारे, राजेंद्र जाधव, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, अॅड. रविकाका बोरावके, पद्माकांत कुदळे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब कदम, रिपाई (अ)चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब रहाणे, माजी नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद, रिपाईचे तालुकाध्यक्ष अनिल रननवरे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, शहराध्यक्ष सुनील गंगूले, तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, राजकारण निवडणुकीपूरतेच हि कर्मवीर शंकररावजी काळे यांची शिकवून घेवून वाटचाल करीत असतांना सर्वांना सोबत घेवून मतदार संघाचा विकास साधला आहे आणि यापुढील काळात देखील साधणार आहे. २०१९ ला निवडून आल्यानंतर पहिले दोन वर्ष कोविड महामारी असल्यामुळे निधी मिळण्यास काहीसा उशीर झाला परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी मिळविल्यामुळे यापुढील काळात विकासकामांचे फक्त लोकार्पण तसेच नवीन मंजूर करून आणलेल्या कामांचे भूमिपूजन करायचे आहे.मतदार संघाची सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वच कालवे व चाऱ्यांच्या कामाला प्राधान्य देवून ज्या प्रमाणे जिरायती भागातील गावांसाठी उजनी उपसा जलसिंचन योजना राबविली त्या धर्तीवर पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना ओव्हर फ्लोचे पाणी मिळावे यासाठी उपसा जल सिंचन योजना राबविण्याचा मनोदय व्यक्त करून निधी देण्याची मागणी केली. लोकसंख्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण दिवसेंदिवस वाढत असून ज्याप्रमाणे वैनगंगा पैनगंगा वळण बंधाऱ्याच्या योजनेला मान्यता दिली त्याप्रमाणे पश्चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेला वळविण्याच्या प्रकल्पाला लवकरात लवकर पूर्णत्वाकडे न्यावे. मतदार संघातील केटी वेअरचे बॅरीकेट कम पुलाध्ये रुपांतर करून दळणवळणाला अधिक गती मिळवून द्यायची आहे. दक्षिण उत्तर एकच रस्ता असून नवीन रस्त्यांच्या निर्मितीसाठी निधी द्यावा. नवीन एम.आय.डी.सी.सुरू होत असून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी व उद्योग वाढविण्यासाठी मदत करून ४३३ एकर जागेवर नवीन एमआयडीसी उभारणीसाठी सहकार्य करावे. अशा अनेक मागण्या आ. आशुतोष काळे यांनी करून मतदार संघाच्या पुढील विकासाच्या संकल्पना उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्यापुढे मांडल्या
पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार म्हणाले की,आशुतोषच्या रूपाने कोपरगावला उच्चशिक्षित,तरुण तडफदार व विकासाचे व्हिजन असलेलं नेतृत्व मिळाले असून त्याने पाच वर्षात आपल्या कामाचा ठसा उमटविला असून त्याचा मला अभिमान आहे. परंतु मागील वेळी त्याला अवघ्या आठशे बावीस मतांनी निवडून दिले यावेळी त्याला पंच्याऐंशी हजार मतांनी निवडून द्या. कोपरगावची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सुटल्यामुळे कोल्हे परिवाराने निवडणुकीत थांबून घेत आशुतोषला पुढे जाण्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. कोल्हे कुटुंबाचे योग्य पुनर्वसन करण्याचा शब्द त्याच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी दिला असून मी देखील त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजवर मी नेहमीच कर्तबगार माणसाच्या पाठीशी उभा राहिलो आहे. माझ्या ओठात एक आणि पोटात एक हे मला कधी जमलेच नाही आणि जमणार पण नाही. माझे बोलणे नेहमीच सडे तोड असते हे संपूर्ण राज्याच्या जनतेला नाहीत आहे.मला नेहमीच अशी माणस आवडतात जे स्वत:साठी नाही समाजासाठी मागतात. आशुतोषने देखील आजवर स्वत:साठी काही मागितले नाही जे काही मागितले ते कोपरगावच्या जनतेसाठी मागितले आहे. त्याने माझ्याकडे पोलीस स्टेशन इमारत, कर्मचारी वसाहतीसाठी निधी मागितला मी दिला. पाच नंबर साठवण तलावाची लोकवर्गणी माफ करून मागितली ती पण दिली, मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मागितला तो पण मी दिला. वीर महाराणा प्रताप व भगवान एकलव्य यांच्या स्मारकासाठी निधी मागितला तो पण दिला.कारण या सर्व गोष्टी आशुतोषने जनतेसाठी मागितल्या. त्यामुळे आजपर्यंत माझ्याकडे जे जे मागितले ते ते आशुतोषला दिले आहे आणि आशुतोषचे सगळेच हट्ट मी पुरविले आहे. त्याने मांडलेल्या विकासाच्या सर्व संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी यापुढील काळातही कोपरगावच्या मतदार संघाच्या विकासासाठी आशुतोषचे सर्वच हट्ट पूर्ण करीन. तुला जेवढे जास्त मताधिक्य मिळेल तेवढीच तुझी जबाबदारी देखील मोठी राहील याची तयारी करून ठेव असे सूचक वक्तव्य करून मंत्रीपद देण्याबाबत उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुतोवाच केले. या सभेसाठी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी महायुती व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही कामाचे माणसं आहोत. आशुतोषचे कोपरगाव मतदार संघात काम खूप चांगले आहे आम्ही आपण जे काही करतो ते मायबाप जनतेसाठी करतो. आशुतोषने पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारं पावसाचं पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८५ हजार कोटी निधीची गरज आहे. केद्नात महायुतीचे सरकार त्याबाबत देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा केली असून राज्य सरकार राज्य सरकारचे काम करणार आहे परंतु केद्राचा देखील निधी लागणार आहे. वेळप्रसंगी जागतिक बँक व जपानच्या जायको संस्थेचा देखील निधीची गरज भासणार असल्याचे त्यांना सांगितले असून हि कामे आम्ही करणार आहे.- उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार
भाषण सुरु असतांना उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना ठसका लागला. त्यावेळी शेजारीच उभे असलेल्या आ. आशुतोष काळे यांनी त्यांना पाण्याची बाटली दिली. पाणी पिल्यानंतर तुमच्या आमदाराने मला पाणी पाजले आता मला तुम्हाला पाणी द्यावेच लागेल अशी टिप्पणी केली त्यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.