संगमनेर

रेशीम उद्योगातून रोजगाराच्या मोठ्या संधी – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

रेशीम उद्योगातून रोजगाराच्या मोठ्या संधी – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

अमृतवाहिनीच्या थोरात कृषी महाविद्यालयात रेशीम उद्योगावर कार्यशाळा संपन्न; तुती लागवड व कीटक संगोपन मार्गदर्शन कार्यशाळा; जिल्हाभरातील शेतकऱ्यांची उपस्थिती

संगमनेर विजय कापसे दि २८ जानेवारी २०२५दूध व ऊस या पिकांबरोबर शेतकऱ्यांना शाश्वत हमीभाव असलेल्या पिकांची गरज असून रेशीम उद्योगातून नवीन क्षेत्र खुले होत आहे. हलकी जमीन व कमी पाण्यात तुती लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास छोट्या शेतकऱ्यांसाठी हा चांगला व्यवसाय ठरणार असून या रेशीम उद्योगातून चांगल्या उत्पन्नासह रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात जिल्हा रेशीम कार्यालय व एकविरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महा रेशीम अभियान २०२५-२६ अंतर्गत तुती लागवड व कीटक संगोपन माहिती व मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, रेशीम तज्ञ तथा आंतरराष्ट्रीय सल्लागार  प्राचार्य डॉ अधिकराव जाधव, बारामतीच्या केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ हुमायून शरीफ, जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, तालुका कृषी अधिकारी रेजी बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रा जी बी बाचकर, प्रा. बाबा खरात, प्रा. कृष्णा मोहिते, भाऊसाहेब नवले, नामदेव गायकवाड आदींसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील उत्कृष्ट रेशीम उत्पादन घेणाऱ्या १५ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मा. महसूल मंत्री थोरात म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात कमी पाणी आणि हलके शिवार असलेल्या क्षेत्रात तुती पिकासाठी मोठा वाव आहे. शेतकऱ्यांना दूध व ऊस या व्यतिरिक्त शाश्वत हमीभाव मिळवून देणारे हे पीक आहे. छोट्या शेतकऱ्यांना परवडेल असा हा चांगला व्यवसाय आहे . घरातील महिला आणि लहान  या रेशीम उद्योगात काम करू शकतात. यातून नवीन क्षेत्र खुले होणार असून सुरुवात जरी लहान असली तरी आगामी काळात  रेशीम उद्योगाचे क्षेत्र विस्तीर्ण आणि मोठे होणार आहे .

जाहिरात आत्मा

संगमनेर तालुक्यामध्ये तुती लागवड याचबरोबर कोश निर्मिती आणि रेशीम उत्पादन याला मोठी संधी असून ग्रामीण अर्थव्यवस्थेत हा कृषी व्यवसाय बळकटी देणारा आहे. शासनाचा कृषी विभाग, रेशीम विभाग व कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त तुती लागवड करण्यासाठी काम करा यावर प्रक्रिया निर्मिती केंद्र या ठिकाणी सुरू केल्यास नक्कीच भविष्यात रेशीम उद्योग हा मोठा व्यवसाय ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रेशीमला मोठी मागणी असून या मागणीची आपल्या तरुण शेतकऱ्यांसाठी रोजगाराची व शाश्वत उत्पादनाची ही मोठी संधी ठरणार असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक आधुनिक बदल करताना मोठे उत्पादन मिळवले आहे. शेतीमध्ये आधुनिकता गरजेची असून रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. महिलांसाठीही हा चांगला व्यवसाय असल्याने या परिसरात जास्त तुती लागवड झाल्यास प्रोसेसिंग युनिट आपल्याला सुरू करता येईल असेही त्या म्हणाल्या.

तर डॉ.जाधव म्हणाले की, संगमनेर तालुका हा प्रगतशील तालुका आहे आणि यामध्ये कृषी व्यवसायाच्या मोठा वाटा आहे. फळबागा ऊस टोमॅटो डाळिंब याबरोबर तुती लागवड यासाठी या परिसरात अनुकूल वातावरण असून शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधांबरोबर मार्गदर्शन केले जाईल तरुणांना रोजगाराची मोठी संधी रेशीम उद्योगातून असल्याने अधिकाधिक तरुणांनी या नव्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी शास्त्रज्ञ डॉ. हुमायून शरीफ, रेजी बोडके यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.नामदेव कहांडळ यांनी केले तर प्रा.जी.बी बाचकर यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील शेतकरी आणि कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे