आपला जिल्हा

श्रमसंस्काराची शिदोरी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर- उपसरपंच विवेक परजणे

श्रमसंस्काराची शिदोरी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर- उपसरपंच विवेक परजणे

श्रमसंस्काराची शिदोरी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर- उपसरपंच विवेक परजणे

संवत्सर विजय कापसे दि २८ जानेवारी २०२५ : महाविद्यालयीन युवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी होऊन प्रामाणिकपणे समाजाची समाजसेवा करावी. श्रमाला महत्त्व द्यावे व त्यासोबतच शिस्तबद्ध जिवन जगावे श्रमसंस्काराची शिदोरी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर होय असे प्रतिपादन संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

जाहिरात

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, संवत्सर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक १६ जानेवारी २०२५ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीत पार पडले. या शिबिराचे दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी समारोप प्रसंगी  विवेक परजणे  बोलत होते. प्रारंभी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे, स्व. डॉ.बाळासाहेब विखे, स्व. नामदेवराव परजणे पाटील (अण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी कोकमठाण गावच्या सरपंच  उषाताई एकनाथ दुशिंग होत्या.

जाहिरात

व्यासपीठावर  संदिप शिवाजी लोहकणे ,  निर्मला शंकर जाधव (मुख्यध्यापिका), विशाल जाधव (पुरातत्व विभाग),  दिपक रोहोम,  लक्ष्मणराव साबळे,  चंद्रकांत लोखंडे,  सोमनाथ पाटील निरगुडे, खंडोबा पाटील फेपाळे, लक्ष्मण आण्णा परजणे, बापू तिरमखे,  बंडू नाना आचारी, रमेश गायकवाड , आदिनाथ कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात आत्मा

सरपंच सौ.उषाताई दुशिंग म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराला विकासाची संधी मानून काम करावे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमाला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमदान शिबिरातून स्वयसेवकांना सकारात्मक ऊर्जा मिळते. राष्ट्रीय सेवा योजना हा विद्यार्थ्यांसाठी एक कार्यानुभव आहे. यातूनच विद्यार्थ्यांना एकमेकात समरस होण्याची संधी मिळते.

जाहिरात

महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करत मान्यवरांचे स्वागत केले. समारोप प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक कु. कल्याणी भाकरे, साक्षी टेके, खिलारी मयुरी यांनी शिबिरात आलेले अनुभव व्यक्त केले. तसेच शिबीर काळात  फैय्याजखान पठाण,  दिलीपराव ढेपले माजी केंद्रप्रमुख, साई बाबा संस्थान माजी विश्वस्त सचिन तांबे, डॉ. प्राचार्य विलासराव आवारी यांचे व्याख्यान संपन्न झाले. तसेच माजी जिल्हापरिषद सदस्य राजेश परजणे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सांगितले कि, राष्ट्रीय सेवा योजना हे फक्त शिबिरापुरते मर्यादित न राहता शिबिरार्थीनी आयुष्यभर त्याचा वापर आपल्या जीवनात करणे गरजेचे आहे. डॉ. बी.एस. गायकवाड (तालुका समन्वय) यांनी शिबीरस्थळी भेट देऊन शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.

समारोप कार्यक्रमाचे अहवाल वाचन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रुपनर मॅडम यांनी केले. प्राचार्य.सदाफळ सर यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन कु. मगर सुष्ट्री हिने केले. या उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्षा मा.ना. शालिनीताई राधाकृष्ण विखे पा., राजेश परजणे  (चेअरमन, गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील ता. सह. दूध उत्पा. संघ लि., कोपरगांव) संस्थेच्या सचिव मीरा काकडे, यांनी कौतुक केले आभार प्रदर्शन प्रा. कदम सर यांनी केले. रा. से.यो. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सदाफळ वाय. आर., प्रा. रुपनर सी.एन., प्रा.परजणे ए. के., प्रा. कदम डी.सी., प्रा. आसने बी.व्ही., प्रा. उकिरडे एस. आर., प्रा. सोनवणे पी. एल. ,प्रा. देवकर जे. आर.,  सिनारे ए.के. , प्रा. सूर्यवंशी एस. जे., प्रा. कडू एच. आर.,  शिंदे एन. बी,  गुंड पी डी,  सोनवणे इ. एम,  निरगुडे आर एस. यांनी परिश्रम केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे