कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात कोपरगावचा समावेश करावा- राजेंद्र झावरे
तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन देत केली मागणी
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि २८ जानेवारी २०२५– आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात कोपरगावचा समावेश करावा अशी मागणी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना मंगळवार दि २८ जानेवारी रोजी निवेदन पाठवत केली असून सदर निवेदनाची प्रत कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत व नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे दिली आहे.
जाहिरात
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्याला व शहराला दक्षिणकाशी व दक्षिण वाहिनी पवित्र गंगा गोदावरी नदीमुळे तसेच दैत्य गुरु शुक्राचार्य, कचदेव, देवयानी, संजीवनी विद्या, त्र्यंबकेश्वर मंदिर, साई तपोभूमी, विभांडक ऋषी, शृंगेश्वर ऋषी, विष्णू मंदिर, नारदाची नारादी झाली ते ठिकाण, राघोबा दादा पेशवे वाडा, संत जनार्दन स्वामी व जंगली महाराज आश्रम, संत रामदासी महाराज आदीमुळे पौराणिक धार्मिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.जाहिरात
त्यांच्या कथा व आख्यायिका सर्वश्रुत आहे व आपणासही माहित आहे त्याचे साक्षी व पुरावे आजही येथे पाहावयास मिळतात या सर्व नोंदी शासन दप्तरी आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक पवित्र गंगा गोदावरी स्नानासाठी व शुक्राचार्य कचेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
जाहिरात
या धार्मिक पौराणिक व ऐतिहासिक शहराच्या मधोमध पवित्र गंगा गोदावरी नदी वाहत आहे. भाविकांसाठी व तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूला अंदाजे ३० किलोमीटर घाट बांधणे आवश्यक आहे तसेच शहराच्या आजूबाजूच्या गावात जे सांडपाण्याने नदीपात्र व पाणी प्रदूषण होते ते सांडपाणी शुद्ध करून पुन्हा नदीपात्रामध्ये सोडणे आवश्यक आहे तसेच वरील प्रमाणे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंदिराच्या परिसर सुशोभीकरण करणे व आवश्यक सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे तरी आपण सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिहस्थ कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात कोपरगावचा समावेश करावा जेणेकरून कोपरगाव च्या सर्व धार्मिक बाबींचा विकास करणे शक्य होणार असल्याचे राजेंद्र झावरे यांनी आपल्या निवेदनातून म्हटले आहे.जाहिरात
सदर निवेदन देतेप्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे, भाजपाचे विनोद राक्षे, वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख इरफान शेख, उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, विकास शर्मा, मधू पवार, युवा सेना शहर प्रमुख शेखर कोलते, प्रवक्ते राहुल देशपांडे आदी उपस्थित होते.