आपला जिल्हा

आ.थोरात यांच्या सभांना राज्यभरातून मोठी मागणी तर संगमनेरात कार्यकर्तेच बनले प्रचार मोहिमेचे सारथी

आ.थोरात यांच्या सभांना राज्यभरातून मोठी मागणी तर संगमनेरात कार्यकर्तेच बनले प्रचार मोहिमेचे सारथी

राज्यभर झंजावाती प्रचार दौरे

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १५ नोव्हेंबर २०२४काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात अनुभवी सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्व आहे. महाविकास आघाडीच्या होणाऱ्या राज्यभरातील विविध सभेसाठी त्यांना मोठी मागणी असून आमदार बाळासाहेब थोरात राज्यभर झंजावाती दौरा करत आहेत .तर संगमनेर तालुक्यातील प्रचाराचे सारथी म्हणून सर्व कार्यकर्ते जबाबदारी सांभाळत आहेत.

जाहिरात

संगमनेर तालुक्यातून सलग आठ वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्यकर्तृत्वातून लौकिक निर्माण केला आहे. अत्यंत अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना 44 आमदार निवडून आणले. त्याचबरोबर महाविकास आघाडी स्थापनेमध्ये मोठा सहभाग त्यांचा राहिला. राज्य व राष्ट्रीय पातळीवर संधीचा त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने उपयोग केला.

जाहिरात

निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळग्रस्तांना पाणी दिले. अनेक मोठमोठ्या विकासाच्या योजना राबवल्याने संगमनेर तालुका ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात यांचा राजकीय बालेकिल्ला सुद्धा राहिला आहे. राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण झाले असून विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून लोकाभमुख केलेली कामे, आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे त्यांना राज्यभरातील सभांसाठी मोठी मागणी आहे.

 विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यापासून आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुंबई, धुळे, रावेर, शिर्डी, पुणे, हडपसर, जुन्नर, नांदेड, औरंगाबाद, चंद्रपूर, हिंगोली, कोल्हापूर, सोलापूर, सांगली सातारा, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पालघर या विविध जिल्ह्यांमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभा घेतल्या आहेत. या सर्व प्रचार सभांना मोठी उपस्थिती मिळाली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांचे राज्यभर झंजावाती दौरे सुरू असताना संगमनेर तालुक्याच्या प्रचाराची जबाबदारी तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता सारथी बनून पार पाडत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने साहेब तुम्ही राज्य सांभाळा आम्ही तालुका सांभाळतो असे सांगितल्याने आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यभर महाविकास आघाडी करता काम करत आहेत. याबाबत खासदार राहुल गांधी खासदार मल्लिकार्जुन खर्गे, खा.शरचंद्रजी पवार, मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , यांच्यासह विविध सभा घेतल्या असून या सर्वांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे.

नेता राज्यात, नेत्यासाठी जनता मैदानात

संगमनेर तालुक्याने राज्याला सहकार, शिक्षणासह सुसंस्कृत राजकारणाची परंपरा दिली. आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यात महाविकास आघाडीसाठी काम करताना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या करता संगमनेर तालुक्यात जनता प्रचारात उतरली असल्याने ही निवडणूक एकतर्फी व मोठी मताधिक्याची होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे