आपला जिल्हा

आ.थोरात यांच्या प्रचारार्थ संगमनेरात संवाद रॅलींना मोठा प्रतिसाद; शहरात सर्व प्रभागांमधून जनतेचा मोठा पाठिंबा

आ.थोरात यांच्या प्रचारार्थ संगमनेरात संवाद रॅलींना मोठा प्रतिसाद; शहरात सर्व प्रभागांमधून जनतेचा मोठा पाठिंबा
आ.थोरात यांच्या प्रचारार्थ संगमनेरात संवाद रॅलींना मोठा प्रतिसाद; शहरात सर्व प्रभागांमधून जनतेचा मोठा पाठिंबा
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १५ नोव्हेंबर २०२४सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहराला वैभवशाली बनवणारे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ संगमनेर शहरात होणाऱ्या सर्व संवाद फेऱ्यांना शहरातील सर्व व प्रभागांमधील नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आमदार थोरात यांचे नेतृत्व संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद ठरले असल्याचे सौ.दुर्गाताई तांबे यांनी म्हटले आहे.

जाहिरात
प्रभाग 10 व 11 मध्ये झालेल्या संवाद रॅलीमध्ये सौ.दुर्गाताई तांबे,अमर कातारी, किशोर टोकसे, डॉ.मैथिलीताई तांबे,निखिल पापडेजा,अंबादास आडेप,अमोल डुकरे, शुभम परदेशी, सौ.प्रमिला अभंग, कन्हैया कागडे, मंगेश पाचारकर, मुकेश परदेशी,बंटी पवार अरीसह विविध पदाधिकारी सहभागी झाले.

जाहिरात

यावेळी सौ.दुर्गाताई तांबे म्हणाले की संगमनेर शहरात 24 तास स्वच्छ मुबलक पाणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी राबवलेल्या निळवंडे धरण थेट पाईपलाईन योजनेतून मिळाले. हायटेक बस स्थानकासह विविध वैभवशाली इमारती आणि हॅप्पी हायवे हा संगमनेर करांसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो आहे. स्वच्छ व सुंदर संगमनेर शहराबरोबर गंगामाई घाट परिसर सुशोभीकरण असे अनेक विकास कामे आमदार बाळासाहेब थोरात यांनी शहरात राबवली असून शांत व सुबत्ता असलेले शहर म्हणून संगमनेरचा देशात लौकिक झाला आहे. हा लौकिक निर्माण करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचा प्रत्येक संगमनेर शहरवासीयांना अभिमान असल्याचे ते म्हणाले. तर अमर कतारी म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. निवडणूक संपली की विरोध संपला ही इथली संस्कृती आहे. निष्ठावंत शिवसैनिक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभा आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार असून आमदार बाळासाहेब थोरात यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध प्रभागांमधून नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे