खताळ यांच्या प्रचारार्थ ना.विखे पाटील यांनी घेतली सावरगावतळ आणि पेमगिरीत प्रचार सभा
खताळ यांच्या प्रचारार्थ ना.विखे पाटील यांनी घेतली सावरगावतळ आणि पेमगिरीत प्रचार सभा
खताळ यांच्या प्रचारार्थ ना.विखे पाटील यांनी घेतली सावरगावतळ आणि पेमगिरीत प्रचार सभा
संगमनेर विजय कापसे दि १५ नोव्हेंबर २०२४– कोव्हीड संकटाच्या काळात जे तुमचे झाले नाहीत ते आता तरी तुम्हाला जवळ कसे करतील, ४० वर्षात यांनी या तालुक्याला फक्त धाक व दडपशाही दिली. विकासाच्या नावाखाली फक्त स्वत:ला मिरवून घेतले. युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देवू न शकणाऱ्यांना या निवडणुकीत धंदा शिकवा. हा तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

संगमनेर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ सावरगावतळ आणि पेमगिरी या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभेत मंत्री विखे बोलत होते या वेळी व्यासपीठावर या जाहीर सभेला महायुतीचे उमेदवार अमोल खताळ भाजप ज्येष्ठ नेते दादा भाऊ गुंजाळ शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे रमेश काळे वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ अशोक इथापे भाज पचे उपाध्यक्ष अशोक कानवडे माजी पंचायत समिती सदस्य सुनिता कानवडे शौकत जागीरदार अण्णासाहेब गोडसे डॉ सोमनाथ कानवडे तसेच सावरगाव तळ येथील सभेला भाजप माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे भाजप उपाध्यक्ष बाळा साहेब शेटे परसराम नेहे शरद नेहे राव साहेब थिटमे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संगमनेर तालुक्याची परंपरा आहे, तालुक्यातील सत्ताधा-यांच्या निवडणूका अडचणीत आल्या की, त्यांची धाकदडप शाही सुरु होते. यापुर्वीही झालेल्या कार खाना आणि विधानसभेच्या निवडणूकीत यांनी दहशतीनेच विजय मिळविले आहेत यंदा तर त्यांना आता जनता थारा द्यायला ही तयार नाही त्यामुळेच आता नातेवाईक मित्र व सर्वसामान्य माणसांची आठवण झाली आहे.प्रत्येकाच्या घरी जावून दबाव आणण्याचे काम सुरु झाले आहे. पण आता आपला स्वाभिमान जागृत करुन, या तालुक्यात परिवर्तन घडवा असेही त्यांनी आपल्या भाषणातून सुचित केले.

चाळीस वर्षांच्या वाटचालीत आजपर्यंत फक्त दिशाभूल करण्याचे काम झाले, खोटी आश्वासनं दिली गेली. औद्योगिक वसाहतीत तीस हजार युवकांना रोजगार दिल्याचा दावा करतात, हा कोणाला तरी पटण्यासारखा आहे का असा प्रश्न उपस्थित करुन, जिथे उद्योगच आणले नाहीत तिथे रोजगारच तरी कसा उपलब्ध होणार. यांच्या सहकारी संस्था सोडल्या तर, रोजगाराची कुठलिही साधनं निर्माण करु शकले नाही हेच यांचे मोठे अपयश असल्याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.
ही निवडणूक कारखान्याची नाही, विधानसभेचे आहे.केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला पाहीजे. पण यांचा लेखाजोखा दहशतीच्या पुढे जायला तयारच नाही. शिर्डीत येवून दहशतीची भाषा करतात, अरे कधीतरी विकासाचे काय करणार हे सांगा.स्वत:च्या तालुक्या तही हे केलेला विकासही सांगू शकत नाही, हेच यांचे मोठे अपयश अशा शब्दात मंत्री विखे यांनी आमदार थोरात यांचा समाचार घेतला.महायुती सरकारने न मागता योजना जाहीर केल्या, लाडक्या बहीणींसाठी योजना सुरु केली तर, हेच कॉंग्रेसचे नेते कोर्टात गेले. आता राहुल गांधी येवून तीन हजार रुपये देतो असे सांगतात, मग अडीच वर्ष काय झोपले होते का? एक रुपयात पीक विमा योजना सुरु करुन, तालुक्यातील शेतक-यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा केले. दूधाचे अनुदान दिले, वीज बिल माफ केले. आता नव्याने सरकार येवू द्या, शेतक-यांची कर्जमाफी सुध्दा महायुती सरकार करुन दाखवेल याची ग्वाही देखील ना.विखे पाटील यांनी दिली.
संगमनेरच्या लोकप्रतिनिधीचे राजका रण फक्त माफीयांच्या भोवती अवलंबुन आहे. त्यांच्या माध्यमातून गावागावात धाकदडपशाही केली गेली. पण या निवडणूकीत जनता जागृत झाली आहे. युवकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे, असा स्वाभिमान जागृत ठेवून या तालुक्यात परिवर्तन करण्याची भूमिका बजवा, हा तालुका दहशतमुक्त करण्या साठी महायुती सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील असे मंत्री विखे पाटील यांनी आश्वासित केले. संगमनेर तालुक्यातील यापेमगिरी सारख्या ठिकाणी चांगले पर्यटनस्थळ निर्माण होवू शकते. या माध्यमातून या भागात रोजगा राच्या संधी आहेत, महायुती सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी देण्याचे आश्वा सित करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, या तालुक्यातील समृध्दतेलासहकारी साखर कारखाना कारणीभूत ठरलामाजी मंत्री ते मला फोन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे , दत्ता देशमुख, माजी मंत्री बी.जे खताळ पाटील यांच्या योगदानातून हे सर्व उभे राहीले. पण त्याची जाणीव आठवण ही यांनी ठेवली नाही.
नांदुरी दुमालाच्या माजी सरपंचाचा समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला गावचे माजी सरपंच अर्चना शेळके भाऊ साहेब नेहे माजी उपसरपंच ऍड. मिना नाथ शेळके सोनबा पथवे ग्रामपंचायत सदस्य निखिल निळे नामदेव कोकणे व वंदना कोकणे डॉ सोपान कवडे. नांदुरी सोसायटी संचालक चंद्रभान शेळके अशोक मेंगाळ विलास शेटे यांच्यासह शेळके यांच्या समर्थकांनी अनेक वर्ष माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस विधि मंडळ पक्षनेतेआ बाळासाहेब थोरात यांचे समर्थक म्हणून काम केले परंतु काँग्रेस पक्षातर्गत असलेल्या नाराजीला कंटाळून मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचा दीड महिन्यापूर्वी राजीनामा देऊन आज पेमगिरी येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा यांच्या उपस्थितीत प्रवेश करून महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केलेले नांदुरीचे माजी सरपंच ऍड मीनानाथ शेळके यांनी व्यक्त केला



