ना. राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजयदादा विखे पाटील साईबाबांचा सर्व धर्म समभावाचा मंत्र कृतीत आणून सर्वांना सोबत घेऊन चालणारे
ना. राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजयदादा विखे पाटील साईबाबांचा सर्व धर्म समभावाचा मंत्र कृतीत आणून सर्वांना सोबत घेऊन चालणारे
ना. राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजयदादा विखे पाटील साईबाबांचा सर्व धर्म समभावाचा मंत्र कृतीत आणून सर्वांना सोबत घेऊन चालणारे
शिर्डी विजय कापसे दि १६ नोव्हेंबर २०२४– राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजयदादा विखे पाटील साईबाबांचा सर्व धर्म समभावाचा मंत्र कृतीत आणून सर्वांना सोबत घेतात त्यांच्याकडे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला विकसित करण्याकरिता जागतिक स्तरावरील विकासाचे परिपूर्ण व्हिजन आहे त्यामुळे हा मतदारसंघ अल्पावधीतच गतिमानतेने विकसित झालेला व सुरक्षितता प्रदान असणारा मतदार संघ म्हणून देशात नावारूपास आला आहे याचे श्रेय मंत्री विखे पाटील परिवारास आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विकासपुरुष असून त्यांना लाखाच्यावर मताधिक्यांनी निवडून देऊन मतदार संघातील मतदार राज्यात नवा इतिहास घडवतील असा विश्वास शिर्डी येथील उद्योजक अरविंद आप्पा कोते यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीचे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बैठकीत उद्योजक अरविंद आप्पा कोते आपले मत व्यक्त करत होते त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी तीर्थक्षेत्राचे लोकप्रतिनिधी आहेत साईबाबांची मोठी कृपादृष्टी व आशीर्वाद विखे पाटील साहेबांवर व परिवारावर आहे निस्सिम साईभक्त असणारे मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी देवस्थान चा तसेच शहराचा व परिसराचा विकासात्मक कायापालट केला आहे साई समाधीवर फुल अर्पण करण्याकरिता बंदी होती मंत्री विखे पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकऱ्यांच्या माध्यमातून न्यायालयीन लढा उभारून फुल उत्पादक शेतकरी विक्रेता व व्यापाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे आता समाधीवर फुल अर्पण करण्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला असून या निकालाने शेतकरी शेतमजूर फुल विक्रेता तसेच शिर्डी शहर व परिसराच्या अर्थकारणाला अधिक चालना मिळणार आहे उच्चशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याबरोबरच उद्योजक बनविण्या करिता शिर्डी परिसरात 500 एकर जागेत औद्योगिक वसाहत उभारली जात आहे.
त्याचबरोबर सावळीविहीर येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणी शिर्डी शहरात थिम पार्क महसूल भवन बेघर व हक्काची जागा नसणाऱ्यांना घराचे स्वप्नपूर्ती करीता प्रकल्प असे एक ना अनेक विकासाचे प्रकल्प आणून शिर्डीत विकास साधला जात आहे विधानसभा मतदारसंघाचा विचार करता शिर्डी बरोबरच इतर शहरांचा व गावांचा सर्वांगीण व समतोल विकास साधण्यासाठी मंत्री विखे पाटील व डॉ सुजयदादा विखे पाटील नेहमीच कार्यतत्पर असतात त्यामुळे येथे विरोधकांना खोटं पण रेटून बोलावे लागत आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधलेला विकास व रोल मॉडेल बनवलेला मतदार संघ यापुढे विरोधकांची डाळ शिजणार नाही शिर्डी मतदार संघ हा आपला परिवार असून मतदार संघातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना संकट प्रसंगी आधार देणारा आधारवड म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजयदादा विखे पाटील आहेत त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत राज्याचे महसूल मंत्री अर्थात सच्चा लोकनेता असणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लाखाच्यावर मताधिक्याने निवडून देऊन मतदार संघातील जनता राज्यात नवा इतिहास घडवतील व विरोधकांना येथे थारा नाही यावर पुन्हा शिक्कामोर्तब करतील असा विश्वास उद्योजक अरविंद आप्पा कोते यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.