आपला जिल्हा
रमजान ईद हा बंधुभाव व समतेचा संदेश देणारा सण – माजीमंत्री थोरात

रमजान ईद हा बंधुभाव व समतेचा संदेश देणारा सण – माजीमंत्री थोरात

Sangmner vijay kapse दि २१ मार्च २०२६- भारतामध्ये विविध धर्म – पंथ – जात असूनही मानवताधर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारे आहे. रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो. जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि पवित्र भावनेने हा सण साजरा करतात. यामध्ये देशातील सर्व धर्मीय सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभाव व समतेचा संदेश देणारा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.









