रक्तदान म्हणजे गरजवंताला जीवदान- चैताली काळे
रक्तदान म्हणजे गरजवंताला जीवदान- चैताली काळे

कोपरगाव विजय कापसे दि १६ डिसेंबर २०२४– जगात सर्व श्रेष्ठ हे रक्तदान असुन ते दान करणे म्हणजे साक्षात गरजवंताला जीवनदान देणे होय असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी वारी गावात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

सविस्तर वृत्त असे की, नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील वारी गावातील जय संजय जाधव मित्र मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते या प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, गोदावरी बायोरिफायनरीज लीमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके, कोपरगाव तालुका भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव जाधव, कोपरगाव मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सुरेश जाधव, रमेश टेके, आण्णासाहेब ठोंबरे, वारीच्या सरपंच योगीता बद्रीनाथ जाधव, विजयसिंह गायकवाड, नवनाथ लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.





