कोपरगाव सकल आंबेडकर समाजाच्या अध्यक्षपदी प्रकाश दुशिंग तर उपाध्यक्ष पदी संदीप पगारे
राजकिय गट तट विसरून सर्व पक्षीय सकल आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
कोपरगाव विजय कापसे दि १६ डिसेंबर २०२४ – समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारण विरहित कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकर समाजाची बैठक नुकतीच संपन्न होऊन सकल आंबेडकर समाजाच्या कोपऱ्यात तालुका व शहर संघटनेच्या अध्यक्षपदी नेहमीच सामजिक कार्यात आग्रेसर असणारे समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे प्रकाश दुशिंग यांची तर उपाध्यक्ष पदी संदीप पगारे यांची निवड करण्यात आली आहे.
रविवार दि १५ डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते ॲड.भास्कर गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झालेल्या बैठकीत सर्वप्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत परभणी येथे शहिद झालेल्या भीम सैनिकाला आदरांजली अर्पण करत माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी प्रास्ताविक करत ही राजकारण विरहित संघटना स्थापन करण्यामागचा हेतू स्पष्ट केला.
या प्रसंगी प्रा. रमेश गवळी, बौद्धाचार्य प्रल्हाद जमदडे, दादासाहेब साबळे, मधुकर कोपरे गुरूजी, दिपक गायकवाड, अशोक शिंदे, रावसाहेब साठे, दिनकर खरे, बिपिन गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकर समाजाच्या कार्यकारिणीच्या कार्याध्यक्ष पदी शरद खरात, सचिवपदी अनिल रननवरे व नितीन बनसोडे, संघटक पदी माजी नगरसेवक संजय कांबळे, प्रसिद्धीप्रमुख पदी रविंद्र साबळे, अनिल बनसोडे तर कोअर कमिटी सदस्य पदी दिपक गायकवाड , युवराज दुशिंग , दिनेश कांबळे ,प्रफुल्ल शिंगाडे ,मनोज शिंदे ,बाबासाहेब कोपरे , संतोष कोपरे , राजेंद्र पगारे , देवराम पगारे , रावसाहेब साठे ,संतोष शेजवळ , राकेश वाघ , साईनाथ जाधव ,देविदास गायकवाड आदींची निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी बैठकीचे अध्यक्ष ॲड. भास्कर गंगावणे, दिपक गायकवाड, शरद खरात, अनिल रननवरे,रमेश गवळी, मधुकर कोपरे आदी मान्यवरांनी संघटनेच्या स्थापनेचा उद्देश सांगत सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले.