आपला जिल्हा

रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कांदा टाकून शेतकऱ्यांनी केले तीव्र आंदोलन

रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कांदा टाकून शेतकऱ्यांनी केले तीव्र आंदोलन
खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांकडून कांदा टाकून मदत

कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संतप्त : महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ११ नोव्हेंबर २०२५ सध्याचे महायुतीचे केंद्र व राज्य सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार आहे. या सरकारला शेतकरी आणि गोरगरिबांचे कोणतेही घेणे देणे नाही. राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे. कांद्याला अवघा 180 रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी शेतकऱ्यांनी पाच ट्रॅक्टर कांदे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये टाकून सरकार विरोधात घोषणा देत तीव्र आंदोलन केले.

जाहिरात

वडगाव पान येथे कांद्याला 180 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी सरकारकडे पैसे नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या रस्ते दुरुस्तीसाठी सर्व शेतकऱ्यांनी हे पाच ट्रॅक्टर  कांदे खड्ड्यांमध्ये टाकले. ही आमच्याकडून सरकारला मदत असे म्हणत घोषणाबाजी केली.  यावेळी कारखान्याची मा चेअरमन बाबा ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, गणेश गडगे, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब थोरात, विक्रम ओहोळ, प्रशांत थोरात ,कैलास थोरात, बाबासाहेब थोरात ,मनोज थोरात, निलेश थोरात, संभाजी थोरात, मंगेश थोरात, अजय थोरात ,सोमनाथ कुळधरण, नरेंद्र वायकर, संदीप काशीद, धनंजय थोरात ,सतीश थोरात ,सुनील थोरात, अविनाश थोरात ,गणपत थोरात, आदींसह युवक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रातील राज्य सरकार हे शेतकरी विरोधी आहे त्यांना गोरगरिबांनी शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नाही. निवडणुकीमध्ये घोषणाबाजी केली की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतीमालाला हमीभाव देऊ मात्र असे काही झाले नाही. उलट आज १८० रुपये क्विंटल अशा कांद्याला भाव दिला ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.

सरकारकडे पैसे नाहीत घोषणाबाजी मात्र खूप करत आहे रस्त्यांवर खड्डे पडले आहे म्हणून हे खड्डे बुजवण्यासाठी आम्ही कांदे टाकत आहोत असे ते म्हणाले.

तर विक्रम ओहोळ म्हणाले की, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात कृषी व महसूल मंत्री असताना त्यांनी कायम शेतकऱ्यांना मोठी मदत केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली. मात्र आत्ताचे कृषिमंत्री महसूल मंत्री यांना शेतकऱ्यांचे काही घेणेदेणे नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची खूप चेष्टा सुरू असून या सरकार विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा असे आव्हान केले.

तर निलेश थोरात म्हणाले की तरुणांना काम नाही बेरोजगारी वाढली आहे शेतीमालाला भाव नाही अशी स्थिती असताना फक्त मोबाईल मध्ये तरुणांना गुंतू ठेवण्याचे काम या लोकांनी केले आहे. इंस्टाग्राम च्या जमान्यात वेगवेगळ्या रील तयार करायच्या. अभद्र टीका करायची. या सरकारचे दिवस आता भरले असून सर्वसामान्य नागरिक व युवक पेटला आहे. महायुती सरकारला खाली खेचण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र येऊन लढा असे आव्हान त्यांनी केले

सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आपले सर्व कांदे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये टाकले पाच ट्रॅक्टर कांदे रस्त्यावर आल्याने सर्व परिसर लाल कांद्यांनी भरून टाकला होता रस्त्यांवरील खड्डे दिसत नव्हते त्यामुळे सर्व कांदेच कांदे रस्त्यावर झाले होते. यावेळी तरुणांनी महायुती सरकार सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे