आपला जिल्हा

गायत्री थोरातच्या रूपाने जवळके गावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

गायत्री थोरातच्या रूपाने जवळके गावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
गायत्री थोरातच्या रूपाने जवळके गावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १३ एप्रिल २०२५कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील ज्येष्ठ नेते लक्ष्मण दादा थोरात यांची नात जवळके गावच्या शिरपेचात तुरा रोवलेल्या गायत्री रामभाऊ थोरात हिची जपान या विदेशी नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याबद्दल जवळके तसेच परिसराच्या वतीने कर्मवीर शंकराव काळे सहकारी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात

या प्रसंगी व्यासपीठावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे संचालक राहुल रोहमारे,भारतीय जनता पार्टीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष कैलास राहाणे, माजी संचालक सुनिल शिंदे,मा.पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहाणे, के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक संदिप रोहमारे,माजी सरपंच बंडुभाऊ थोरात, शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष रावसाहेब थोरात, माजी सरपंच बाबुराव थोरात,सरपंच गोपीनाथ राहाणे,सरपंच विक्रम पाचोरे,उपसरपंच सुनिल थोरात ,माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, ह.भ.प भास्कर महाराज गव्हाणे, ह.भ.प साईराम महाराज राहाणे आदींसह परिसरातील शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
भाजपा कोपरगांव तालुका अध्यक्ष कैलास रहाणे यांनी गायत्रीचे अभिनंदन करताना सांगितले की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराच्या वतीने नेहमीच मदत केली जाते तसेच अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतीही परीक्षा अवघड नाही. विद्यार्थ्यांनी कुठलाही नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करून आव्हानांना सामोरे गेले पाहिजे. जिद्द न सोडता,शेवटपर्यंत प्रयत्न करा, यश नक्कीच प्राप्त होईल तर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे व्हा.चेअरमन चव्हाण यांनी अभिनंदन करतांना सांगितले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. अशा काळात ग्रामीण भागातील मुला-मुलींनी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता जिद्द व अभ्यासात सातत्य ठेवून प्रयत्न करावेत. शिक्षणामुळे समाजाची प्रगती होते. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन युवकांनी शिक्षण घेऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगत गायत्री ला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ती भावुक झाल्याचे पहावयास मिळाले.तर निवडीबद्दल कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सह समस्त जवळके व परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी टीव्ही व मोबाईलच्या अति वापरापासून दूर राहून गरजे पुरताच मोबाईलचा वापर करत जास्तीत जास्त मैदानी खेळ तसेंचवअभ्यासासोबत अवांतर वाचनावर  भर देत कठोर  परिश्रम व प्रामाणिक पणा अंगाशी बाळगावा त्यातून यश हमखास मिळते.
 गायत्री थोरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे