डॉ घायतडकर क्लिनिकच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्ताने महाप्रसाद वाटप
डॉ घायतडकर क्लिनिकच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्ताने महाप्रसाद वाटप
डॉ घायतडकर क्लिनिकच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्ताने महाप्रसाद वाटप

कोपरगाव विजय कापसे दि १३ एप्रिल २०२५- कोपरगाव येथील प्रसिद्ध डॉ घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकच्या शनिवार दि १२ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शारदा नगर येथे पायी दिंडी सोहळ्यास महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या श्री क्षेत्र बाणगाव ते श्री क्षेत्र शिर्डी या पायी दिंडी सोहळ्याचे हनुमान जयंती दिनी कोपरगाव शहरातील शारदानगर येथील डॉ घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ कुणाल घायतडकर यांच्या निवासस्थानी वाजत गाजत आगमन झाले असता त्यातील सर्व सहभागी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करत डॉ कुणाल घायतडकर व डॉ भाग्यश्री घायतडकर यांच्या हस्ते पालखीची पूजा आरती करत श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी ह.भ.प शिंदे महाराज, पेटकर साहेब ,दिग्विजय शेळके, लोहाटे सर,मोरे सर, कुटे सर, अशोक नरोडे, जालिंदर घायतडकर, नितीन घायतडकर, साहेबराव जाधव, पाटील, टोरपे सर, रमेशकाका वराडे, गौरव घायतडकर, सुकदेव घायतडकर, पोपट घायतडकर , ज्ञानेश्वर भड, धनंजय भड ,सज्जन कवडे, विश्वनाथ देवकर, चेतन बाळू हिरे, त्रिनाथ पवार ,कमल वराडे, हार्डेकर नानी, जयश्री जाधव, शोभा जाधव, आशा नरोडे, लोहाटे ताई, शोभाताई घायतडकर ,वैद्य ताई, रुपाली शिंदे,देशमुख ताई, शिंदे ताई, मोरे ताई,बडे ताई, कुटे ताई, कासार ताई,खुले ताई, शिंदे आजी ,नागरे आजी, बिडवे आजी, गोरडे आजी आदी शारदानगर वासियासह दिंडी मधील भाविक भक्त उपस्थित होते.




