आपला जिल्हा
दृढ निश्चयाने सामोरे गेल्यास यश हमखास- तहसीलदार सावंत
दृढ निश्चयाने सामोरे गेल्यास यश हमखास- तहसीलदार सावंत
महिला महाविद्यालयात कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी विद्यार्थीनींना स्पर्धा परीक्षा विषयावर केले मोलाचे मार्गदर्शन
कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२५– जीवनात कुठल्याही परीक्षेला दृढ निश्चय करत सामोरे गेल्यास त्यात यश हमखास मिळते असा मौखिक सल्ला कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना व प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी संचलित कोपरगाव येथील बीएससी होम सायन्स बीसीए महिला महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष समसंस्कार शिबिर २०२४-२५ चा उद्घाटन प्रसंगी तहसीलदार सावंत बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक बीसीए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी दुर्गा कासार हिने करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व सांगितले तर सदर प्रसंगी मान्यवरांचे स्वागत बी कॉम प्रथम वर्षाची विद्यार्थीनी आकांक्षा बरे व ग्रुपने केले. मान्यवरांचा परिचय तृतीय वर्ष बीसीएची कल्याणी ढोक हिने करून दिला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदाची सूचना द्वितीय वर्ष बीसीएची वृषाली आहेर हिने मांडली तर त्यास द्वितीय वर्ष बीसीएच्या करुणा जमदाडे हिने अनुमोदन दिले.
याप्रसंगी तहसीलदार सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले की, आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी आदी प्रशासनातील मानाच्या महत्त्वाच्या पदावर काम करायचे असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना वेगवेगळ्या माध्यमातून सामोरे जावे लागते आणि त्यात यश संपादन करण्यासाठी आपल्या अंगात अभ्यासाची जिद्द,चिकाटी तसेच दृढ निश्चय हा महत्त्वाचा असतो त्यामुळे भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनींनी शालेय जीवनापासूनच अभ्यासाची क्षमता वाढवत अवांतर वाचनावर भर देण्याचे आवाहन तहसीलदार सावंत यांनी करत अभ्यास करण्याचा मूलमंत्र देत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा संबंधी महत्त्वाची माहिती सांगितली.
सदर कार्यक्रम कार्यक्रम प्रसंगी एस वाय बीसीएच्या विद्यार्थिनी पायल कांगणे हिने देखील आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनी कल्याणी ढोक व मयुरी महाजन हिने तर उपस्थितांचे आभार तृतीय वर्ष बीसीएची विद्यार्थीनी रेखा गवारे हिने व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.