धांदरफळ बुद्रुक सोसायटीच्या चेअरमन पदी अशोक गोर्डे तर व्हा.चेअरमन पदी सावळीराम साबळे यांची निवड
धांदरफळ बुद्रुक सोसायटीच्या चेअरमन पदी अशोक गोर्डे तर व्हा.चेअरमन पदी सावळीराम साबळे यांची निवड
संगमनेर विजय कापसे दि २० जानेवारी २०२५-
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा सोसायटीने कायम सभासद व कर्जदार यांचे हित जोपासत आर्थिक दृष्ट्या चांगली प्रगती केली आहे. व आता या सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी अशोक दिगंबर गोर्डे तर व्हा. चेअरमनपदी सावळीराम कोंडाजी साबळे यांची संचालक मंडळाच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी संचालक मारुती कोल्हे , संजय देशमुख , संजय देशपांडे, अशोक देशमुख, सावळेराम साबळे, बाळासाहेब काळे , पुंजा डेरे, ज्ञानेश्वर जाधव, छगन खरात, उल्हास गोसावी, विमल अभंग , कल्पना शेटे आदी मान्यवर उपस्थित होते
या निवड कामी उपनिबंधक कार्यालयाचे चतुटे उपस्थित होते. सदर निवडीकामी अनिल कासट, अनिल काळे, भाऊसाहेब डेरे, बाळासाहेब देशमाने ,रामनाथ अभंग यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीसाठी आदिनाथ खुरपे, दीपक शेळके , कैलास शेटे, काशिनाथ खुरपे, भानुदास शेटे सिताराम देशमुख, सुनील देशमुख, भिकाजी काळे ,सुनील देशमुख बाळासाहेब देशमुख, जावेद तांबोळी अमोल महाले, विलास कोल्हे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा आ .डॉ.सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, ॲड माधवराव कानवडे, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.