करंजी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष आगवन तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत चरमळ
करंजी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष आगवन तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत चरमळ
करंजी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष आगवन तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत चरमळ
कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२५– कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील एक अग्रगण्य माजी आमदार अशोकदादा काळे, आमदार आशुतोष काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी मार्गक्रमण करत असलेल्या करंजी विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी संतोष भास्करराव आगवन व व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत रामभाऊ चरमळ यांची नुकतीच एकमताने जेष्ठ संचालक तथा मार्गदर्शक कारभारी आगवन यांचे प्रमुख उपस्थितीत व निवडणुक निर्णय अधिकारी शेख साहेब यांचे अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी करण्यात आली.
या प्रसंगी करंजी विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व आजी माजी संचालक सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित चेअरमन संतोष आगवन व व्हाईस चेअरमन चंद्रकांत चरमळ तसेच सोसायटीचे माजी चेअरमन संजय कारभारी आगवन यांची नुकतीच सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा गौतम सहकारी बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी करंजी विविध कार्यकारी सोसायटीचे जेष्ठ संचालक तथा मार्गदर्शक कारभारी आगवन यांनी आपल्या भाषणात नवनिर्वाचित चेअरमन संतोष आगवन व्हाईस चेअरमन चंद्रकांत चरमळ यांचे अभिनंदन करत संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी विना सहकार नाहि उद्धार या म्हणी प्रमाणे सर्वाना सोबत घेऊन एकदिलाने सर्वांच्या मार्गदर्शनाने काम करण्याचा सल्ला देत सर्वाना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.