अमृतवाहिनीत २ व ३ फेब्रुवारी ला भव्य मेधा सांस्कृतिक महोत्सव
राज्यातील तरुण आमदारांच्या युवा संवादसह अमाल मलिक यांचा लाईव्ह कॉन्सर्ट
संगमनेर विजय कापसे दि २२ जानेवारी २०२५– मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून २ व ३ फेब्रुवारी २०२५ रोजी मेधा संस्कृतिक महोत्सव होणार आहे. यामध्ये राज्यभरातील तरुण आमदार व खासदार यांच्या युवा संवादासह बॉलिवूडमधील आघाडीचा गायक व संगीतकार अमाल मलिक यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांनी दिली आहे.
मेघा सांस्कृतिक महोत्सव २०२५ बाबत अधिक माहिती देताना सौ.शरयूताई देशमुख म्हणाल्या की, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्ता पूर्ण वाटचाल करत देशात लौकिक मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मेधा महोत्सवात यावर्षी रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ सुधीर तांबे, विश्वस्त शरयूताई देशमुख, युवा नेते राजवर्धन थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मेधा महोत्सवाचे उद्घाटन होईल.
यावेळी यशस्वी उद्योजक तथा व्याख्याते शरद तांदळे यांच्या उपस्थितीत अमृतवाहिनी संस्थेतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा होणार आहे. यानंतर सायंकाळी सहा वाजता मेधा मैदानावर बॉलीवूडमधील आघाडीचा गायक व संगीतकार अमाल मलिक याचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे.
तर सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता युवा संवाद या कार्यक्रमात नंदुरबारचे युवा खासदार ॲड.गोवाल पाडवी, सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार रोहित.आर. पाटील, आमदार वरून देसाई, आमदार मनोज कायंदे, आमदार श्रेयजा अशोक चव्हाण सहभागी होणार असून ज्येष्ठ संगीतकार व गायक अवधूत गुप्ते हे त्यांची मुलाखत घेणार आहेत. या प्रसंगी आमदार सत्यजित तांबे हे उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी अमृतवाहिनी व विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे दर्जेदार सांस्कृतिक होणार आहे.
त्याच बरोबर मेधा महोत्सवात गायन, वादन, वैयक्तिक नृत्य,सामूहिक नृत्य, क्रीडा, पेंटिंग, यांचा विविध कलाविष्कारांचा समावेश आहे. तर विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देण्यासाठी वसंतदादा क्रीडा संकुल येथे तांत्रिक प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे. या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल ही विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तरी या मेधा महोत्सवासाठी सर्व पालक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मेघाचे समन्वयक प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश, व्यवस्थापक प्रा.व्ही.बीधुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, डॉ.विलास शिंदे सर्व प्राचार्य व संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.