तळेगाव मधील ध्रुव अविनाश दिघे बेपत्ता झाल्याने परिसरात चिंता
ध्रुव अविनाश दिघे बेपत्ता झाल्याने तळेगाव परिसरात चिंता
संगमनेर विजय कापसे दि २२ जानेवारी २०२५– जयहिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे येथील शिक्षक अविनाश दिघे यांचा मुलगा ध्रुव हा 1 जानेवारी 2025 पासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने दिघे कुटुंबीयांसह तळेगाव परिसरात मोठी चिंता निर्माण झाली आहे.
गोविंद नगर येथे राहत असलेल्या अविनाश दिघे यांचा मुलगा ध्रुव हा 17 वर्षांचा असून 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी सहा वाजल्यापासून तो बेपत्ता झाला आहे. त्याने मेहंदी कलरचे जॅकेट घातलेले व नारंगी कलरचा फुल टी-शर्ट आहे काळा रंगाचे स्पोर्ट शूज व चष्मा लावलेला असा त्याचा लुक आहे.
अनेक दिवसांपासून त्याचे नातेवाईकांचं सर्वत्र शोधाशोध सुरू असून अजूनही ध्रुवाचा पत्ता लागला नाही. त्यामुळे आई-वडील नातेवाईक चुलते महेश दिघे यांच्यासह सर्वजण चिंतेत आहे.
त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून सर्वत्र शोधाशोध सुरू आहे.
तरी ध्रुव हा कोणाला आढळल्यास तातडीने सर्वांनी आमदार सत्यजित तांबे यांचे स्वीय सहाय्यक महेश दिघे 9579896743 व अविनाश दिघे 9850221608 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन दिघे परिवार व जय हिंद लोक चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.