लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची एन.एम.एम.एस.परीक्षेत गरूड झेप
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची एन.एम.एम.एस.परीक्षेत गरूड झेप
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची एन.एम.एम.एस.परीक्षेत गरूड झेप

अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील ७ विद्यार्थी एन. एम.एम.एस परीक्षा २०२३-२४ मधे शिष्यवृत्तीस पात्र

अहमदनगर प्रतिनिधी दि ७ मे २०२४– महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत ३०१३-२४ मध्ये इयत्ता आठवीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील प्रग्यावान विद्यार्थ्यांना उच्चमाध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी,शिक्षणातील गळती रोखावी यासाठी घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस.परीक्षेची शिष्यवृत्तीधारक अंतीम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून या परीक्षेत विद्यालयातील ११ विद्यार्थी उत्तीर्ण व ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.

यात सानिका निलेश काळभोर ही विद्यार्थिनी केंद्रीय शिष्यवृत्तीधारक असुन प्रत्येक वर्षी १२ हजार रुपये प्रमाणे ५ वर्षासाठी एकूण ६० हजारे रुपये तिला शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच आकांक्षा रविंद्र फाटक, शिवानी सतिश वाडेकर, तनिष्का सोमनाथ धुमाळ, तनिष्का भाऊसाहेब कर्डिले, प्रांजल श्याम ससे व वेदांत श्रीकांत देठे या विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत प्रत्येक वर्षी ९ हजार ६०० रूपये प्रमाणे ४ वर्षासाठी एकूण ३८ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

हे सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक- विभाग प्रमुख कारखिले मंगेश, पालवे प्रदीप, धामणे अमित, लांडगे संगीता व आठवीच्या इयत्तेस अध्यापन करणारे सर्व शिक्षक मुख्याध्यापिका काकडे छाया,ज्येष्ठ शिक्षक भद्रे महादेव या सर्वांचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आ. आशूतोष काळे,मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. आ. दादाभाऊ कळमकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, अभिषेक कळमकर, अर्जुनराव पोकळे, स्थानिक स्कुल सदस्य अंबादास गारुडकर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर शिवाजीराव लंके ,अध्यक्ष व सदस्य व्यवस्थापन समिती,व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक- पालक संघ, मुख्याध्यापिका, संस्था हितचिंतक,पालक,ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



