आपला जिल्हा

जीवनात यशस्वीतेसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – प्रा.साहेबराव दवंगे; वारीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर

जीवनात यशस्वीतेसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – प्रा.साहेबराव दवंगे; वारीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर
जीवनात यशस्वीतेसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – प्रा.साहेबराव दवंगे; वारीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर
कोपरगाव विजय कापसे दि ८ जुन २०२५: दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरचा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमातून आणि मिळवलेल्या गुणातून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासाचे गणित अवलंबून असते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये कमी गुण मिळाले तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर शिक्षणातील कोणताही पर्याय निवडून परिश्रम घेत आपल्या जीवनात यशस्वी होता येते. मात्र; हे सर्व करताना संस्कारही तितकेच महत्त्वाचे असल्याचा मौलिक सल्ला करियर मार्गदर्शक प्रा. साहेबराव दवंगे यांनी दिला.

जाहिरात
    कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने वारी पंचक्रोशीतील दहावी-बारावीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (दि.6) “दहावी-बारावी नंतर काय ?” या अनुषंगाने करियर मार्गदर्शन शिबिर तसेच विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रा. साहेबराव दवंगे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब साबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वारी गावचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते रामदास सोनवणे होते. कार्यक्रमाची राहुल दादा टेके यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.

जाहिरात
    प्रा. दवंगे म्हणाले, जीवनात तारुण्यदशा ही अत्यंत महत्त्वाची आहे. या काळात मनुष्य कोणतेही आव्हान पेलू शकतो. यातून कोणत्याही परिस्थितीवर मात करता येणे शक्य होते. त्यामुळेच योग्य वेळी योग्य संधीचा उपयोग केल्यास पुढील आयुष्य सुखकर होऊन एक उत्तम व संस्कारक्षम आयुष्य जगता येते. त्यामुळे नेहमी प्रयत्नवादी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे.   

जाहिरात
     बाळासाहेब साबळे म्हणाले, आता दहावी-बारावीची निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या प्रक्रियेमध्ये प्रशासनाच्यावतीने जी काही मदत लागेल त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. यावेळी डॉ. सर्जेराव टेके, जितेंद्र टेके व प्रा. गिरीश काशीद यांनी विद्यार्थ्यांनी खचून न जाता येईल त्या परिस्थितीला सामोरे जात यशस्वी होण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात रामदासजी सोनवणे म्हणाले, शिक्षण हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यातून देशाची योग्य संस्कारक्षम व ध्येयवादी विचारांची पिढी निर्माण होत असते. त्यामुळे अशा प्रकारचे शिबिर ग्रामीण भागात सुरू झाले ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. पुढील काळात याही भागातून मोठे अधिकारी निर्माण होतील यात शंका नाही. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात टेके पाटील ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी या शिबिराविषयी महत्त्व पटवून देत ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी दहावी-बारावी सह, पाचवी आठवी शिष्यवृत्ती, मंथन परीक्षा, गांधी रिसर्च फाऊंडेशन विविध परीक्षांमध्ये, क्रीडा क्षेत्रात, महाज्योती अंतर्गत मोबाईल टॅब मिळवत प्रावीण्य मिळवलेल्या शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा शाल, गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ट्रस्टच्या मार्गदर्शक स्मिता काबरा यांच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

जाहिरात गौतम
     यावेळी बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोर्डे, प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक एफ. एस. शेख, माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे, माजी पं. स. सदस्य अशोकराव कानडे, परसराम टेके, नानासाहेब टेके, ह.भ.प. विनायक महाराज टेके, ग्रा.पं.सदस्य योगेश झाल्टे, वसंतराव गोरे, डॉ. हिमांशू त्रिवेदी, भाऊसाहेब कडू, दादासाहेब वरकड, प्रतिभा टेके, स्मिता काबरा, निर्मला भारूड, गणेश भाटी, ग्रामविकास अधिकारी संग्राम बोर्डे, सुनील महाले, देवा सोनवणे, चंद्रकांत खेडकर, बाळासाहेब बर्डे, जयसिंग बनगैय्या, विजय गाडेकर, संदीप गायकवाड, जगन्नाथ महापुरे, विकास बिरुटे, अमोल गायकवाड, सनी जाधव, शुभम जिरे, सुरज टेके, स्वप्निल टेके, आकाश निळे, आदित्य निळे, सुधीर वाकचौरे, यश मैराळ, साई मैराळ, शंकर धामणे, सक्षम आवारे, अमित झाल्टे, सपना रोकडे, पायल ठाकरे, रोहिणी ठाकरे, वैष्णवी माने, अंजली झाल्टे, यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुयोग्य असे सूत्रसंचालन प्रवीण आहेर व कैलास शेळके यांनी केले तर वसंत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टचे सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे