आपला जिल्हा

शेकडो विद्यार्थ्यांनी अभ्यासला संगमनेरचा समृद्ध सहकार

शेकडो विद्यार्थ्यांनी अभ्यासला संगमनेरचा समृद्ध सहकार

विविध महाविद्यालयांच्या 3200 विद्यार्थ्यांची थोरात कारखाना, दूध संघासह सहकारी संस्थांना भेट

संगमनेर विजय कापसे दि १८ फेब्रुवारी २०२६ ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करणारी सहकार चळवळ अत्यंत निकोप, शिस्तबद्ध आणि पारदर्शीपणे राबविणारे थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर कार्यरत असलेल्या माजी कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांना 3200 शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली असून देशासाठी मॉडेल ठरणाऱ्या संगमनेरचा आदर्श सहकार त्यांनी अभ्यासला आहे.

जाहिरात

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ या विविध सहकारी संस्थांना अमृतवाहिनी महाविद्यालयातील विविध विद्यार्थी 1200, श्रमिक महाविद्यालय 600, केटीएच महाविद्यालय नाशिक 200, यांच्यासह इतर 1200 संगमनेर तालुक्यातील विविध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.

जाहिरात

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशासाठी दिशादर्शक ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सहकारामुळे समृद्धी आली आहे. सहकारी संस्थांचा प्रत्येक कुटुंबाशी थेट संबंध असून शहरातील व्यापारी व बाजारपेठ यांच्याशी संबंध आहे. यामुळे ग्रामीण विकास, सहकार व बाजारपेठ ही विकासाची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. थोरात कारखान्याने कायम ऊसाला उच्चांकी भाव दिला असून संगमनेर तालुक्यात दररोज साधारण नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून त्यामुळे लहान व गरीब शेतकऱ्यांच्या जीवनात झालेली प्रगती, संगमनेर तालुक्याचे सुसंस्कृत वातावरण, सामाजिक जीवन पद्धती, शैक्षणिक अनुकूलता, समृद्ध बाजारपेठ सातत्याने विकासातून राबवलेल्या विविध योजना यामुळे संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. या प्रगतीमध्ये सहकाराचा मोठा वाटा असून नव्या पिढीला सहकार चळवळ प्रत्यक्ष अनुभवावी या उद्देशाने या विद्यार्थ्यांनी सर्व संस्थांना भेटी दिल्या.

जाहिरात

या भेटीदरम्यान थोरात कारखान्यामधील साखरेची संपूर्ण निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी. उसापासून साखर तयार होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी बारकाईने समजावून घेतला याचबरोबर. को -जनरेशन या प्लांटलाही भेट दिली. दररोज होणारी विद्युत निर्मिती तिचा वापर आणि इथेनॉल प्रकल्प या विविध प्रकल्पांना भेट देऊन कारखाना कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.

तर राजहंस दूधसंघामध्ये गावपातळीवरील दूध सोसायटी मधून आलेल्या दुधावर विविध प्रक्रिया ते पॅकिंग प्रक्रिया याचबरोबर विविध उपपदार्थांची निर्मिती,प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अभ्यासली. तर सहकारी चळवळीला बळकटी देण्याबरोबर शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांना आर्थिक मदतीतून स्थैर्य देणाऱ्या अमृतवाहिनी बँकेच्या कामकाजाची पाहणी ही सर्व विद्यार्थ्यांनी केली.

विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि मनापासून सर्व प्रक्रियांचे निरीक्षण केले. कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या अशा अभ्यास दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच उद्योग, सहकार आणि समाज रचना यांची प्रत्यक्ष ओळख झाली असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी व भविष्यातील करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी असल्याचे श्रमिक महाविद्यालयाचे प्रा.आप्पासाहेब थिटमे यांनी म्हटले आहे.

तर डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यामुळे आम्हाला संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठा असा समृद्ध सहकार अभ्यासण्याची मोठी संधी मिळाली आहे. आमचे महाविद्यालय व कारखाना दूध संघ व्यवस्थापनाची आम्ही सर्व विद्यार्थी आभारी असल्याचे डी.फार्मसी महाविद्यालयाची विद्यार्थिनी तनुजा सोनवणे हिने म्हटले आहे.

प्रत्यक्ष भेटीने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर – जगन्नाथ घुगरकर

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कारखान्याला भेट दिली असून ऊस ते साखर ही निर्मिती प्रक्रिया, याचबरोबर कारखान्यातून होणारी वीज निर्मिती, इथेनॉल प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्याने त्यांना भविष्यासाठी उपयोगी ठरणार आहे. संगमनेर तालुका हा माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र ठरला असून विविध महाविद्यालयांनी प्रत्यक्ष भेटीचे राबवलेले उपक्रम ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारे ठरणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे