आपला जिल्हा
अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचा ओडिसा राज्यात डंका; सांस्कृतिक क्षेत्रातील चॅम्पियनशिप पटकावली

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचा ओडिसा राज्यात डंका; सांस्कृतिक क्षेत्रातील चॅम्पियनशिप पटकावली

संगमनेर विजय कापसे दि ३० जानेवारी २०२६– माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ सुधीर तांबे आणि कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूलने राष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल थिएटर फेस्टिवल कटक ओडिसा येथे 2026 वर्षाची सांस्कृतिक क्षेत्रातील चॅम्पियनशिप मिळवली असून संस्थेच्या यशामध्ये एक मानाचा तुरा खोवला असल्याची माहिती प्राचार्य आशिष कुमार यांनी दिली आहे.






