आपला जिल्हा

पालखेड येथे पंधरा वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

पालखेड येथे पंधरा वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
पालखेड येथे पंधरा वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
जाहिरात कोल्हे

वैजापूर विजय कापसे दि १९ मार्च २०२५: तालुक्यातील पालखेड येथे सन २०१० साली १० वी च्या वर्गात शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहमिलना निमित्ताने पुन्हा एक दिवसाची शाळा भरवली. या प्रसंगी २०१० साली या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे सर्व शिक्षक उपस्थित होते.परिपाठने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

जाहिरात आत्मा
       पुन्हा तोच उत्साह, पुन्हा तोच हास्य विनोद, मौजमस्तीत हे सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी या कार्यक्रमास उपस्थित होते.या बॅचच्या विद्यार्थ्यापैकी कोणी सैन्यदल कोणी शिक्षक, इंजिनिअर कोणी व्यावसायीक तर कोणी शेती उद्योगात व्यस्त आहेत. धकाधकीच्या जिवनात पुन्हा एकदा मित्रमैत्रिणींची प्रकर्षाने उणिव भासल्याने या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला व रविवार दिनांक १६ मार्च रोजी हे सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी पुन्हा एकत्र आलेत.अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पुन्हा भेटण्याच्या आनाभका घेण्यात आल्या. शेवटी ४.३० वाजता भावनाविवश होऊन साश्रु नयनांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

जाहिरात
     याप्रसंगी एन. एस. तांगडे, एस. पी. कोठुळे, एस. पी. मुलमुले व के. एस. जगदाळे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दादासाहेब शेजुळ; सागर निकम, सागर धनाड, वाल्मिक धनाड, सचिन त्रिभुवन, दिपक गाडेकर, गायत्री धनाड, प्राप्ती वाबळे, कावेरी लाड, शितल जगताप, प्रियंका वायकोस, ज्योती जगताप, प्रतिभा जगताप, पूजा जगताप, दिपाली जगताप या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे