संगमनेर
जयहिंदच्या वतीने गुरुवारी लोकशास्त्र सावित्री हे मोफत नाटक
जयहिंदच्या वतीने गुरुवारी लोकशास्त्र सावित्री हे मोफत नाटक

संगमनेर विजय कापसे दि १९ मार्च २०२५– संगमनेर शहर व तालुक्यातील महिला सबलीकरणासाठी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वा.सह्याद्री कॉलेज येथे शर्मिला देशमुख यांचे आर्थिक साक्षरता या विषयावरील व्याख्यान व 6 वा. राज्य पातळीवर विविध पुरस्कार मिळालेले लोकशास्त्र सावित्री हे नाटक आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सौ.दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.




