आपला जिल्हा
बेशिस्त वाहन चालकावर शहर पोलिसांची कारवाई; तर न्यायालयाने सुनावला त्यांना २१ हजाराचा दंड
बेशिस्त वाहन चालकावर शहर पोलिसांची कारवाई; तर न्यायालयाने सुनावला त्यांना २१ हजाराचा दंड

कोपरगाव विजय कापसे दि १९ मार्च २०२५–कोपरगाव शहरात बेशिस्त वाहन चालका विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कारवाईचा बडगा उगारला असून नुकतीच कोपरगाव शहरात दारू पिऊन वाहन बेशिस्त पणे चालवणाऱ्या तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ चालकाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांना न्यायालयाने त्यांना तब्बल २१ हजाराचा दंड सुनावला आहे.

विचित्र आवाज करणाऱ्या दुचाकी होणार जप्त….दुचाकीचे कंपनीचे सायलन्सर बदलून कर्णकर्कश फटाके फोडत विचित्र आवाज देणारे सायलन्सर आपल्या दुचाकी वाहनाला लावून तसेच अत्यंत मोठ्या विचित्र आवाजातील हॉर्न लावून वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकां विरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करत गुन्हा दाखल केला जाईल तर प्रसंगी त्यांचे वाहन देखील जप्त केले जाईल.भगवान मथुरेकोपरगाव शहर पोलिस निरीक्षक







