आपला जिल्हाकाळे गट

पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला १ कोटीहुन अधिकचा निव्वळ नफा – देवेंद्र रोहमारे

पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला कोटीहुन अधिकचा निव्वळ नफा – देवेंद्र रोहमारे

पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला कोटीहुन अधिकचा निव्वळ नफा – देवेंद्र रोहमारे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ एप्रिल २०२५  :– कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४/२५  या चालू आर्थिक वर्षात १ कोटी ०१ लाख  २४ हजार ६२४  रुपये निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

जाहिरात

            दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, सहकारी संस्थाना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सुरु केलेली पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्था स्व. साहेबांच्या आदर्श विचारांच्या तत्वावर संस्थेचे मार्गदर्शक मा. आ. अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संस्थेकडे ४३ कोटी ७८ लाख ठेवी असून कर्जवाटप २८ कोटी ६८ लाख आहे. वसूल भाग भांडवल ०१ कोटी १८ लाखराखीव व इतर निधी १२ कोटी ३० लाख तसेच गुंतवणूक ३० कोटी ५६ लाख आहे. निव्वळ एनपीए ०% असून थकबाकी प्रमाण २.३४% असल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी दिली आहे.

जाहिरात

कोळपेवाडी व परीसरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांची वेळेत आर्थिक गरज पूर्ण करून चोख व्यवहाराच्या पद्धतीमुळे संस्थेने सभासद, ठेवीदार यांचा मोठा विश्वास कमविला असून संस्थेचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सहा महिन्यापासून कोपरगाव शहरात पतसंस्थेची दुसरी शाखा सुरु करण्यात आली आहे. संस्थेने मिळविलेल्या नावलौकिकामुळे कोपरगाव शाखेत देखील ठेवीदार व कर्जदार यांनी विश्वास दाखविल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होवून संस्थेची कोपरगाव शाखा सहा महिन्यात नफ्यात आलेली आहे. संस्थेला सलग दोन वर्ष राज्य स्तरावरील उत्कृष्ट कामाबद्दल ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार मिळालेले आहेत.

जाहिरात

           कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहातील कर्मचारी तसेच  कोपरगाव  शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील छोट्या  मोठ्या व्यावसायिकांना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी पतसंस्थेने  भांडवल उपलब्ध करून दिले असून सभासदांचे आणि कर्जदारांचे हिलक्षात घेवून चेअरमन,व्हा.चेअरमन, संचालक मंडळ करीत असलेल्या कामातून पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्था दरवर्षी चांगली कामगिरी करीत आहे. त्याबद्दल मा.आ.अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांनी चेअरमन,व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे