संगमनेर

अमृतवाहिनीच्या ई अॅण्ड टी सी च्या ७० विद्यार्थ्यांना नोकऱ्या

अमृतवाहिनीच्या ई अॅण्ड टी सी च्या ७० विद्यार्थ्यांना नोकऱ्या

अमृतवाहिनीच्या ई अॅण्ड टी सी च्या ७० विद्यार्थ्यांना नोकऱ्या

जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि १८ मे २०२४उच्च शिक्षणानंतर नोकरीसाठी होणारी धावपळ वाट्याला न येता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ई. अॅण्ड टी. सी. विभागातील ७४ पैकी ७० विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नोकऱ्या मिळणे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रीया प्राचार्य डॉ. एम.ए. व्यंकटेश व विभाग प्रमुख डॉ. आर.पी. लबडे यांनी व्यक्त केली.

जाहिरात

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आय.टी. आणि इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी कंपन्यांना लागणारे कौशल्यपूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षमतेमुळे अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या इंजिनियर्सला जगभरातील नामांकित कंपन्यांकडून मागणी होत आहे. या क्षेत्रातील गतिमान विकासाच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानातील गरजा ओळखून अमृतवाहिनी व्यवस्थापनाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य करार केलेले आहेत. महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जपान व जर्मन भाषेवर प्रभुत्व मिळवले आहे.

जाहिरात

यासाठी महाविद्यालयाने ‘सकुरा’ हे जपानी भाषेच्या वाढीसाठी केंद्र विकसीत केले आहे. या वर्षीच्या प्लेसमेंटस् मध्ये मुलभुत इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचा सर्वाधिक समावेश असल्याने विद्यार्थी व पालक वर्गामध्ये भावी शाश्वत करिअरबद्दल समाधान व्यक्त होत आहे. आय.टी. क्षेत्रातील कंपन्यांच्या अल्प कर्मचाऱ्यांकडून काम करण्याच्या धोरणामुळे सद्यस्थितीतील प्लेसमेंट मध्ये तेजी कमी जाणवत असल्याने टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये मागणी वाढत आहे. इलेक्ट्रीक वाहने, सेमिकंडक्टर चीप डीझाईन, वाहन उद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञान, इंण्डस्ट्री ४.० तंत्रज्ञान या सर्व बाबींमुळे ई. अॅण्ड टी. सी. च्या विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळत आहेत.

जाहिरात– पीटर इंग्लंड , कोपरगाव स्टोअरच्या GRAND ANNIVERSARY साठी आपणास खास आमंत्रण आणि यानिमित्त तुम्हाला एक खास ऑफर देत आहोत. आत्ताच भेट द्या आणि मिळवा प्रत्येक 1000 च्या खरेदीवर 500 ची सूट, संपर्क– ०२४२३-२९९२६१.पत्ता – अण्णाभाऊ साठे चौकाजवळ, येवला रोड, कोपरगाव.

ई. अॅण्ड टी. सी. विभागातील कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी, इंन्टर्नशीप, मुल्यवर्धक कार्यक्रम, स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस, प्रकल्प स्पर्धा, माजी विद्यार्थी संवाद, कंपन्यांतील तज्ञांचे मार्गदर्शन या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक व वैयक्तीक तयारी होण्यास मदत झाली आहे, परिणामी प्लेसमेंटची संख्या वाढत आहे.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीरजी तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अॅकेडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, विभाग प्रमुख डॉ. आर.पी. लबडे, प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. बी. वाकचौरे, प्लेसमेंट विभाग समन्वयक प्रा. व्ही. आर. आवारे यांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे