माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

पत्रकार संघटनेच्या वतीने स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा गौरव करणे स्तुत्य उपक्रम- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

पत्रकार संघटनेच्या वतीने स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा गौरव करणे स्तुत्य उपक्रम- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कोपरगाव तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३१ ऑगस्ट २०२४महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण भागातील करंजी येथील कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयातील स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या ६ विद्यार्थ्यांचा व जिल्हा परिषद शाळेतील ३ विद्यार्थ्यांचा तसेच सहभागी झालेल्या ८५ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देत सन्मान करणे हा संघटनेचा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात

शनिवार दि ३१ ऑगस्ट रोजी राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगावच्या निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, संघटनेचे तालुकध्यक्ष जनार्दन जगताप ,सरपंच रविंद्र आगवन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, डॉ विकास सोनवणे, डॉ सुनील देसाई, मुख्याध्यापक दिनकर माळी, संघटनेचे शहराध्यक्ष हाफिज शेख, उपशहरध्यक्ष स्वप्निल कोपरे, सिद्धार्थ मेहेरखांब, विनोद जवरे, काकासाहेब खर्डे, राजेंद्र तासकर, सचिव विजय कापसे आदी पत्रकारांसह शिक्षक वृंद तसेच निलेश कापसे, अनिल शिंदे, दादासाहेब कुहिले, गणेश फापाळे, गणेश भिंगारे, आशपाक मणियार,मच्छीन्द्र भिंगारे, योगेश आगवन, एकनाथ कापसे आदी शिक्षणप्रेमी नागरिकांसह ग्रामस्थ पालक उपस्थित होते.

जाहिरात

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ते समाजातील प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी आपल्या समोर आणत असतात त्यामुळे त्यांच्या वतीने आपला सन्मान होणे ही नक्कीच भूषणावह बाब असल्याचे गौरवोद्गार पाटील यांनी करत कर्मवीर शंकरराव काळे व जिल्हा परिषद शाळेचे आधारस्तंभ कारभारी आगवन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या दोन्ही शाळा अत्यंत सुंदर असून शाळेत मुलांनी शिक्षणाव्यतिरिक्त परसबागेत लावलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे फळ झाडे पालेभाज्या ,शालेय परिसराची स्वच्छता, विद्यार्थ्यांचा नीटनेटकेपणा, तसेच मैदानात असलेल्या मैदानी खेळाचे साहित्य बगून अभ्यासाबरोबर मैदानी खेळाकडेही शाळेचे लक्ष आहे हे बघून खूप आनंद वाटल्याचे सांगत इतक्या मोठ्या संख्येने ग्रामिण भागातील स्कॉलरशिप परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक दिनकर माळी व दोन्ही शाळेच्या शिक्षकांचे पाटील यांनी अभिनंदन करत शुभेच्छा व्यक्त केल्या.

या प्रसंगी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कार्यक्रमाचे अध्यक्ष कारभारी आगवन, पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव विजय कापसे यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक ललित जगताप यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा करंजीचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कोपरगाव तालुका व शहर पदाधिकारी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी राज्य पत्रकार संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे