माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

शासनाने नगरपालिका सवर्ग व कर्मचारी संघटनांच्या मागण्या मान्य कराव्यात- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

शासनाने नगरपालिका सवर्ग व कर्मचारी संघटनांच्या मागण्या मान्य कराव्यात- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

शासनाने नगरपालिका सवर्ग व कर्मचारी संघटनांच्या मागण्या मान्य कराव्यात- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ सप्टेंबर २०२४गेल्या सात दिवसापासून महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद सवर्ग अधिकारी संघटना या त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन करून उपोषणास बसले आहेत. यात मोठ्या प्रमाणात महिला वर्गही आहे. या सर्व संघटनांनी वेळोवेळी शासन दरबारी आपल्या मागण्या निवेदनाद्वारे दिलेले आहेत. परंतु अद्यापही शासनाने त्या मंजूर करून लागू केल्या नाहीत. म्हणून महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी उपोषणास बसले आहेत. निश्चितपणाने नागरिक या नात्याने त्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी त्यांना पाठिंबा व्यक्त करून त्यांचे सर्वांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचा मागण्या शासनाने तत्काळ पूर्ण करायला हव्या अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिका कर्मचारी आंदोलकांची भेट देत केली आहे.

जाहिरात

नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पाणी विभाग व आरोग्य विभागाचा काही भाग नागरिकांसाठी चालू ठेवलाय. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी व घंटागाडी यासाठी नागरिकांची हाल होत नाही. कर्मचारी संघटना व अधिकारी सवर्ग यांनी पाणी व आरोग्य हे दोन विभाग उपोषणास बसवले नाहीत यासाठी नागरिकांच्या वतीने पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

जाहिरात

यावेळी सवर्ग अधिकारी युनियनचे बाळकृष्ण अंबरचे, तुषार नालकर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर चाकने , मालकर यांच्यासह कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पवन हाडा ,उपाध्यक्ष कैलास आढाव , सल्लागार संजय तिरसे ,दीपक नागरे ,कार्याध्यक्ष अरुण फाजगे , मंदाताई खरात, कल्पना साबळे ,मीनाताई काळे यांच्या सह संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

 

सणासुदीचे व पावसाचे दिवस असल्याने शासनाने मार्ग काढून लवकरात लवकर हे उपोषण थांबवावे. जेणेकरून नागरिकांना जनतेला त्रास होणार नाही. जनतेच्या कामांना विकासाच्या दृष्टीने अडचणी येणार नाही.

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे