कोपरगाव विजय कापसे दि २४ एप्रिल २०२५– महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या जीवामृत तयार करणे मोहिमेअंतर्गत ब्राह्मणगाव येथील भागिनाथ आसने यांच्या वस्तीवर कृषी सहाय्यक सविता वाबळे यांच्या सहकार्याने तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या मदतीने जीवामृत प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वी पार पडला.
जाहिरात
भागीनाथ आसने यांनी हे जीवामृत तयार करण्याची विधी व फायदे सांगताना सांगितले की, काळा गुळ १ कि.ग्रा,देशी गाईचे ताजे गोमुत्र १० लि, वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडा खालील माती १ कि.ग्रा,देशी गाईचे ताजे शेण १० कि.ग्रा,बेसन १ कि.ग्रा,जिवाणू संवर्धक १ लिटर, पाणी १८० लि हे हे सर्व साहित्य एका टाकीत २०० लिटर पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळून घेत हे द्रावण चांगले एकजीव होईपर्यंत काठीच्या सहाय्याने ढवळून घ्या व पोते झाकून २ ते ३ दिवस सावलीत आंबविण्यासाठी ठेवतदोन दिवसानंतर तयार झालेले जीवामृत चांगल्या प्रकारे ढवळून व कापडाच्या सहाय्याने गाळून घेऊन ८ लिटर पाण्यात २ लिटर द्रावण या प्रमाणे फवारणी किंवा आवळणीसाठी हे जीवामृत वापरावे जीवामृत च्या वापरामुळे पिकांना परिपूर्ण प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होतात.जाहिरात
जमिनीतील उपयोगी जीवाणूची संख्या वाढते, एकप्रकारे पिक वाढ संप्रेरक म्हणून काम करते, घरच्या गाईचे शेण व घरी तयार केलेले बेसण वापरल्यामुळे खर्च कमी होऊन पर्यायाने उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते तरच तयार झालेले जीवामृत सात दिवसाच्या आत वापरावे. जीवामृत तयार करतांना सावलीत करावे अशी माहिती भागीनाथ आसने यांनी दिली.