भव्य फ्रीस्टाइल निकाली कुस्त्यांनी रंगला बोरदेवी मातेचा यात्रा उत्सव आखाडा
भव्य फ्रीस्टाइल निकाली कुस्त्यांनी रंगला बोरदेवी मातेचा यात्रा उत्सव आखाडा
भव्य फ्रीस्टाइल निकाली कुस्त्यांनी रंगला बोरदेवी मातेचा यात्रा उत्सव आखाडा

श्रीगोंदा विजय कापसे दि २४ एप्रिल २०२५-बोरी गावचे ग्रामदैवत श्री.बोरदेवी मातेचा यात्रा उत्सव १९ आणि २० एप्रिल रोजी उत्साहात पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धतीने संपन्न झाला. १९ एप्रिल ला पहाटे तीन वाजता यात्रा उत्सव प्रारंभ झाला, हरिभाऊ सोनवणे यांनी मंदिर सजावट केली होती, हजारो भाविकांनी बोरदेवी मातेचे दर्शन घेतले, दंडवत घेतले, अभिषेक केला, गावातील अनेकांनी देवीच्या नावाने शिरणी वाटली नवस पूर्ण केला, सायंकाळी ठीक ७ वा. भव्य गाडा बगाड हे उत्सवाचे खास आकर्षण ठरले. सायंकाळी आधुनिक आणि पारंपारिक वारसा जपत बोरी ग्रामस्थांच्या लेझीम पथकाने सर्वांची मने जिंकली. रात्री सुनीता राणी बारामतीकर लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. आणि २० एप्रिल रोजी भव्य फ्रीस्टाइल निकाली कुस्त्यांनी यात्रा उत्सवाची सांगता झाली.

महाराष्ट्र चॅम्पियन पै.तुषार सोनवणे, पै.शुभम सोनवणे, पै.काका सोनवणे पै.जयेश थोरात, पै.संतोष सोनवणे, पै.धनंजय वाळुंज, पै.शरद शेळके, पै.दादा शेळके, पै.सुभाष सोनवणे, पै.प्रशांत शेळके, पै.किरण शेळके, पै.उमेश सोनवणे, पै.राहुल शेळके, पै.बाळु वाळुंज, पै.मदन जठार, यांच्या मार्गदर्शनाखाली निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. शेवटची ५५५५५/-₹ ची कुस्तीने आखाड्याची सांगता झाली. श्री.हनुमंत आणि साहेबराव जठार यांनी बोरदेवी केसरी मानाची गदा निकाली कुस्तीसाठी ठेवली होती, पै.आबा शेंडगे यांनी प्रतिस्पर्धी पैलवानला चारी मुंड्या चित करत निकाली फ्रीस्टाइल कुस्ती करून बोरदेवी माता केसरी किताब पटकावला.

सर्व निकाली कुस्त्यांना पै.शहाजी जठार व्यंकटेश पतसंस्था यांच्या सौजन्याने सर्वांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. गावातील अनेक मान्यवरांनी कुस्तीसाठी ५ हजार रु. पासून ३१हजार पर्यंतचे वैयक्तिक निकाली कुस्त्यांसाठी सौजन्य केले होते. एकेकाळी पैलवानांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरी गावात पुन्हा एकदा नव्याने ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. अशी माहिती ग्राम सुरक्षा समिती अध्यक्ष प्रदिप हिवाळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.



